सांगोला:रोटरी क्लब ऑफ़ सांगोला व डॉ.प्रभाकर माळी यांच्या संकल्पनेतून सांगोला तालुक्यातील विद्यार्थी व युवकाना स्पर्धा परीक्षेची तोंड ओळख व्हावी म्हणून खुल्या गटासाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धा परिक्षेसाठी ६५ विद्यार्थी सहभागी झाले होते..त्या मधून नामदेव शेजाळ हा विद्यार्थी सर्वाधिक गुण मिळवून प्रथम आला आहे..बापुसो भडंगे द्वितीय,निसर्ग फुले तृतीय तर भारत इंगवले यांनी चतुर्थ क्रमांक प्राप्त केला आहे..
सर्व बक्षीसपात्र विद्यार्थ्याना रोख रकमेचे बक्षीस, प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देवुन समारंभपूर्वक गौरवण्यात येणार आहे…त्याचप्रमाणे सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे,असे सांगोला रोटरी क्लब तर्फे सांगण्यात आले आहे..