महाराष्ट्रराजकीय

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सोलापूर जिल्हा दौरा

सोलापूर :-  राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दिनांक 7 ते 8 सप्टेंबर 2023 या कालावधीत सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

गुरुवार, दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह सोलापूर कडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. 10.25 वाजता मोटारीने नियोजन भवन सोलापूर कडे प्रयाण. 10.30 वाजता नियोजन भवन , सोलापूर येथे आगमन व आयोजित बैठकीस उपस्थिती –बैठक टंचाई आढावा ( पाणी टंचाई , चारा उपलब्धतेचे नियोजन , मनरेगा व रोहयो कामांची यंत्रणानिहाय उपलब्धता.). 11.30 वाजता जिल्हा नियोजन समिती बैठक स्थळ नियोजन भवन सोलापूर. दुपारी 01.30 ते 02.00 राखीव स्थळ – शासकीय विश्रामगृह सोलापूर . दुपारी 2.00 विविध सार्वजनिक उत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा आढावा. स्थळ नियोजन भवन सोलापूर, 02.30 वाजता लम्पी आढावा बैठक स्थळ –नियोजन भवन सोलापूर. 03.00 वाजता सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विषय संदर्भात बैठक. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरण करणे , महात्मा बसवेश्र्वर पुतळा सुशोभिकरण , शहरातील नियोजीत उड्डाणपूलाचे भूसंपादन करणे. हद्दवाढ भागातील जिल्हा परिषद मालकीचे शाळा व दवाखाने हस्तांतरण करणे. स्थळ : नियोजन भवन सोलापूर, सायंकाळी 05.00 वाजता सहकार पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील , यांच्या जयंती निमित्त शेतकरी , उत्कृष्ट अधिकारी व पदाधिकारी गौरव सोहळा.स्थळ-हिराचंद नेमचंद वाचनालय सभागृह सोलापूर. सोईनुसार शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमन व राखीव. मुक्काम.
शुक्रवार दि. 08 सप्टेंबर 2023 रोजी 10.15 मोटारीने शासकीय विश्रामगृह येथून हुतात्मा स्मारक सोलापूर कडे प्रयाण. 10.30 वाजता हुतात्मा स्मारक येथे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम स्थळ हुतात्मा स्मारक सोलापूर. 11.30 वाजता मोटारीने सोलापूर विमानतळ कडे प्रयाण. 11.50 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन व 12.00 वाजता विमानाने मुंबई कडे प्रयाण.
000000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!