राजकीयसांगोला तालुका

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत ४ कोटी रुपये निधी मंजूर – आमदार शहाजीबापू पाटील.

सांगोला (वार्ताहर) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सांगोला विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या पायाभूत व मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी ४ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, स्वच्छता या सुविधा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी या महत्वकांशी योजनेमार्फत हा भरीव निधी मंजूर झाला आहे. मंजूर झालेल्या सदर निधीमुळे मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय घटकांच्या प्रगतीसाठी व धोरणात्मक विकासासाठी मोठी चालना मिळणार आहे.
सदर योजनेअंतर्गत तालुक्यातील मंजूर झालेला निधी : चिक महुद येथे आडगळे वस्ती येथे रस्ता करणे-१० लक्ष, तिसंगी ता. पंढरपूर येथे नवीन वसाहत दलित वस्तीमध्ये गणपती मंदिर समोर पेविंग ब्लॉक बसविणे-१० लक्ष, तिसंगी येथे बंगाळे वस्ती रस्ता कॉंक्रिटकरण करणे-४लक्ष, तिसंगी गवळी वस्ती येथे रस्ता काँक्रीटकरण करणे-४ लक्ष, तिसंगी रोकडे वस्ती रस्ता काँक्रीटकरन करणे-३लक्ष, भाळवणी ता. पंढरपूर कुचेकर वस्ती अंतर्गत रस्ते करणे-१०लक्ष, गार्डी येथे मरीमाई लक्ष्मी मंदिर पेव्हींग ब्लॉक बसविणे-५ लक्ष, गार्डी येथे दलीत वस्तीत पाणी टाकी बांधणे व रिबोर करणे-५लक्ष, कडलास येथे मेडसिंगी रोड ते भिकाजी ठोकळी वस्ती रस्ता काँक्रीटकरण करणे-१०लक्ष, कडलास येथे इंदिरानगर दलित वस्ती अंतर्गत बंदिस्त गटार करणे-१० लक्ष, महिम येथे सुरेश महापुरे वस्ती येथे मातंग समाजासाठी समाज मंदिर बांधणे-१० लक्ष, बलवडी येथे स्मशानभूमी बांधणे व सुशोभीकरण करणे-१०लक्ष, बलवडी येथे मारुती करडे घर ते सुरज तोरणे घरापर्यंत पेव्हिंग ब्लॉक टाकणे-५लक्ष, शिरभावी येथे शरदचंद्र चंदनशिवे वस्ती येथे पेव्हीग ब्लॉक बसविणे-४ लक्ष, शेळवे ता पंढरपूर येथे गट नंबर 305 हनीफ शेख घर ते समाधान तुकाराम गाजरे घरापर्यंत सिमेंट काँक्रीट करणे१० लक्ष, अकोला येथे गेजगे वस्ती येथे समाज मंदिर बांधणे-१० लक्ष, अकोला येथे मारुती गेजगे घर ते लहू चंदनशिवे घरापर्यंत रस्ता करणे-१० लक्ष, वासुद येथे दलित वस्ती अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसविणे-१० लक्ष, अजनाळे येथे अजनाळे ते हरीबा शंकर भंडगे वस्ती रस्ता काँक्रीटकरन करणे-१०लक्ष, जवळा येथे जवळा दलीत वस्ती अंतर्गत रस्ते पेव्हींग ब्लॉक बसविणे-१० लक्ष, जवळा येथे गावातील मातंग वस्ती, आण्णाभाऊ साठे नगर येथे सार्वजनिक सभागृह बांधणे-१० लक्ष, संगेवाडी येथे संगेवाडी गावातील दलित वस्ती अंतर्गत रस्ते पेव्हींग ब्लॉक बसविणे१० लक्ष, वाटंबरे येथे वाटंबरे गावातील दलित वस्ती गेजगे वस्ती अंतर्गत रस्ते पेव्हींग ब्लॉक बसविणे१०लक्ष, शिवणे येथे शिवणे भीमनगर येथील रामचंद्र कांबळे ते शरद बनसोडे घरासमोरील जागेत पेव्हींग ब्लॉक बसविणे१०लक्ष, य.मंगेवाडी दलित वस्ती अंतर्गत पेविंग ब्लॉक बसविणे-१० लक्ष, मांजरी येथे दलित वस्ती नवीन वसाहत मध्ये पेव्हींग ब्लॉक बसवणे-१० लक्ष, मेडशिंगी येथे गावातील दलित वस्ती अंतर्गत पेव्हिंग ब्लॉग बसविणे-१० लक्ष, हणमंतगाव येथे दलित वस्ती अंतर्गत पेव्हींग ब्लॉक बसवणे-१०लक्ष, लोणविर येथे गावातील मातंग वस्ती भजनावळे ग्रुप येथे पेव्हीग ब्लॉक बसविणे-१० लक्ष, डोंगरगाव येथील चर्मकार वाघमारे वस्ती येथे रस्ता कॉंक्रिटकरण करणे१०- लक्ष, आचकदानी गावातील बौद्ध वस्ती गावठाण समाज मंदिर बांधकाम करणे-१० लक्ष, कोळा येथे हातेकर वस्ती अंतर्गत रस्ते करणे व पेव्हींग ब्लॉक बसविणे-१० लक्ष, वाढेगाव गावातील मंगळवेढा रोड ते ऐवळेवस्ती रस्ता काँक्रीटकरन करणे-१० लक्ष, डिकसळ गावातील नवीन दलीत वस्ती रस्ता काँक्रीटकरन करणे-१० लक्ष , सोनंद येथे दयानंद वाघमारे घर ते मिलिंद ठोकळे घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटकरण करणे-१० लक्ष, हंगिरगे येथे बौद्ध वस्ती येथे समाज मधीर बांधणे-१०लक्ष, गायगव्हाण येथे गावठाण येथील बौद्ध समाज मंदिरासमोर सभा मंडप बांधणे-१० लक्ष, चिणके येथे मंगेवाडी चीणके रस्ता ते प्रकाश काटे घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटकरण करणे-१० लक्ष, हलदहिवडी येथे गावठाण दलित वस्ती अंतर्गत पेव्हीग ब्लॉक बसविणे-१० लक्ष, मेथवडे येथे नवीन गावठाण दलीत वस्ती येथे कॉंक्रिटीकरण करणे-१० लक्ष, एखतपूर येथे हनुमंत गडहिरे शेत ते विजय उबाळे वस्तीपर्यंत रस्ता करणे-१० लक्ष, नराळे येथे गावठाण मरीमाई मंदिरासमोर सभा मंडप बांधणे-१० लक्ष, वाणीचिंचाळे येथे दलीत वस्ती मध्ये पाण्याची टाकी बांधणे-१० लक्ष, धोंडेवाडी येथे विकास वाडी अण्णाभाऊ साठे नगर येथे समाज मंदिर बांधणे-१० लक्ष. या सर्व कामांना एकूण ४ कोटी रूपये निधी मंजूर झाला आहे.
सदर योजनेमध्ये मागासवर्गीय घटकांच्या विकासासाठी रस्ते, पेव्हींग ब्लॉक बसविणे ,रस्ते कॉंक्रिटीकरण करणे ,पाणी टाकी बांधणे, बंदिस्त गटारे करणे, समाज मंदिर बांधणे सार्वजनिक सभागृह बांधणे, बोर रीबोर करणे आदी कामांचा समावेश असल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!