शैक्षणिकसांगोला तालुका

मांजरी विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

मांजरी (ता.सांगोला) येथील रयत शिक्षण संस्थेच्या मांजरी हायस्कूल, मांजरी विद्यालयात 74वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. केदार आर.बी. यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यालयातील RSP ग्रुपने अतिशय सुंदर व मनमोहक संचलन केले .विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त नवचैतन्य व स्फूर्ती निर्माण करणाऱ्या भाषणांचे सादरीकरण केले.तसेच हुशार व गरजू विद्यार्थ्यांना श्री. नवनाथ दत्तात्रय खंडागळे (महाराष्ट्र पोलीस SRPF) यांच्याकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मांजरी पंचक्रोशीत देवदूत म्हणून ज्यांचा परिचय असे सुप्रसिद्ध डॉ. किरण जगताप यांनी विद्यालयाला सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी रोख 11000 हजार रुपये देणगी दिली व मांजरी हायस्कूल, मांजरी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री.बबन जानुजी शेलार यांनी रोख 15000 हजार रुपये देणगी दिली.तसेच श्री. नवनाथ दत्तात्रय खंडागळे यांनी रोख 1000 रुपये देणगी दिली. विद्यालयात मुलींची संख्या जास्त आहे .त्यामुळे मुलींच्या आरोग्याचा विचार करून सौ. सारिकाताई घाडगे यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायत, मांजरी यांच्याकडून दोन सॅनिटरी नॅपकिन मशीन विद्यालयास देण्यात आल्या .विद्यालयाच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे मुख्याध्यापक श्री. केदार आर.बी. यांनी आभार मानले.विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना पालकांनी दिलेल्या गोड खाऊचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. सारिकाताई घाडगे , शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अतुलजी रामदासी, तानाजी खंडागळे, प्रभाकर शिंदे, प्रभाकर खंडागळे ,वसंत शेळके, डॉ. किरण जगताप ,पांडुरंग पवार ,संभाजी शिनगारे तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. लवांडे डी.पी.यांनी केले व आभारचे काम श्री. मागाडे एस.एस.यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!