युगपुरुष,महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी; बसवेश्वर जयंती उत्सवामध्ये शहरातील सर्व समाज बांधवांचा सहभाग

युगपुरुष, थोर समाज सुधारक, मानवधर्माचे जनक, महात्मा बसवेश्वर यांच्या ८९२ व्या जयंती निमित्त दि.२२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता सांगोला शहरतून भव्य मोटासायकल रॅली काढत महापुरूषांच्या पुतळ्यास पुष्हार अर्पण करण्यात आला. सकाळी ११ वाजता महिलांच्या स्पर्धांचा बक्षीस वितरण करून महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पवृष्टी चा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी म.वी.सभा,बसवेश्वर युवक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते,ज्येष्ठ मार्गदर्शक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शनिवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष औदुंबर लोखंडे यांच्या शुभहस्ते रॅलीचे उद्घाटन झाल्यानंतर सांगोला शहरातील प्रमुख मार्गाने भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी शहरातील सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रॅली नंतर महात्मा बसवेश्वरांच्या उत्सव मूर्तीची पूजा म. वी.सभेचे अध्यक्ष सौ व श्री मनोज उकळे यांच्या हस्ते पूजन करून पुष्पष्टी करण्यात आली. यावेळी उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला. जयंती निम्मित घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धांना पारितोषक व रोख रक्कम देऊन सहकार्य करणारे खरेदी-विक्री संघाचे चेअरमन रमेश जाधव,बजरंग गाडे ,अक्षय होनराव अक्षय सपाटे,विवेक उर्फ बबलू पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तर स्मशानभूमी मध्ये हायमास्ट लॅम्प लावण्यासाठी सहकार्य करणारे राजेंद्र गुळमिरे, विनायक लोखंडे निलेश नष्ठे व संतोष पाटील यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान आमदार शहाजीबापू पाटील,माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील,शेकाप चे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख,  चेतनसिंह केदार सावंत,युवा नेते डॉ. पियूष साळुंखे,सागर पाटील,जगदीश पाटील,ॲड उत्तम बनकर,रमेश जाधव, नगराध्यक्ष अनिल खडतरे, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे मंडळाचे चंचल बनसोडे बापूसाहेब ठोकळे,ॲड आनंद बनसोडे, सोपान उर्फ अण्णा बनसोडे पदाधिकारी, शिवप्रेमी मंडळाचे अरविंद केदार, बाळासाहेब शिंदे,प्रताप इंगोले, अरुण काळे, पत्रकार सतीश सावंत, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय खंडागळे व त्यांचे सर्व सहकारी, परशुराम संघटनेचे अमोल लऊकर संजय हसबनिस इत्यादी मान्यवरांनी म बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहर अर्पण करून अभिवादन केले. दुपारी चार वाजता वीर शिवा लिंगायत समाजातील महिलांचा अथर्वशीर्ष पठण हा कार्यक्रम मोठा उत्साह संपन्न झाला.वरील सर्व कार्यक्रमासाठी म वी सभेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी बसवेश्वर युवक संघटनेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते,समाजातील युवक वर्ग,ज्येष्ठ मार्गदर्शक व  महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेवून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button