कृषि आयुक्त डाॕ. प्रविण गेडाम यांचेकडुन गौडवाडी येथील निर्यातक्षम डाळिंब बागांची पाहणी…
राज्याचे कृषि आयुक्त डाॕ.प्रविण गेडाम यांनी सोलापूर जिल्याचे दौऱ्यावर आले आसता सांगोला तालुक्यातील मौजे. गौडवाडी येथे निर्यातक्षम डाळिंब बागांना भेटी दिल्या व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद सादला.
यावेळी डाळिंब शेतीमध्ये येत आसलेल्या आडचनी व उपाययोजना बाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. डाळिंब पिकामध्ये वापरले जाणारे क्राॕप कव्हर(नेट) चे अनुदानामध्ये बदल व्हावा याविषयीचे शेतकऱ्यांचे मत जाणुन घेतले. गौडवाडी गावांमधील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी डाळिंब शेतीमध्ये प्राविण्य मिळवून तयार केलेल्या डाळिंब पॕटर्न विषयी कृषि आयुक्त यांनी सविस्तर माहिती घेतली व समाधान व्यक्त केले. यावेळी नरेगा अंतर्गत डाळिंब फळबाग लागवड, ठिबक सिंचन , बायोगॕस व स्लरी युनिट त्याचबरोबर यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॕक्टर व फवारणीसाठीचे ब्लोअर ची पाहणी केली. पुढे बामणी गावामध्ये चिकू व ड्रॕगनफ्रूट फळपिकाची पाहणी करून शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली.
यावेळी विभागिय कृषि सहसंचालक रफिक नाइकवाडी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गवसाने , प्रकल्प संचालक आत्मा मदन मुकणे ,उप विभागिय कृषि अधिकारी बाळासाहेब लांडगे ,तालुका कृषि अधिकारी शिवाजी शिंदे, अधिकारी/ कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.