महाराष्ट्र
फॅबटेक पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी “ मोटिवेशन आयडिया फॉर ए बेटर टुमारो” याविषयावर सेमिनार आयोजित

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनि. कॉलेज मधील विद्यार्थ्यांसाठी “मोटिवेशन आयडिया फॉर ए बेटर टुमारो” या विषयावर सेमिनार आयोजित केले होते. या सेमिनारसाठी प्रमुख पाहुणे डॉ. सोमनाथ ठिगळे ,इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे, फॅबटेक पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री .सिकंदर पाटील ए. ओ वर्षा कोळेकर उपस्थित होते.
राष्ट्रीय युवा दिवस साजरा करत असताना मोटिवेशन आयडिया फॉर बेटर टुमारो याविषयी डॉ. सोमनाथ ठिगळे सरांनी भविष्यातील आव्हानांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य अवगत केले पाहिजेत. यासाठी स्मार्ट वर्क केले पाहिजे तंत्रज्ञानाची विकसित क्षेत्र सांगत सांगत डॉ सोमनाथ सरांनी दृकश्राव्य माध्यमातून व चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्य सांगितली व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. उपलब्ध साहित्यातून नवीन कौशल्य दाखविली.
या सेमिनारसाठी संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ अमित रुपनर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री.दिनेश रूपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ संजय अदाटे, स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.



