महाराष्ट्र
उत्कर्ष विद्यालयात जागतिक सूर्यनमस्कार दिन उत्साहात साजरा
उत्कर्ष विद्यालयात जागतिक सूर्यनमस्कार दिन सामूहिक व ऑनलाईन या दोन्ही उत्कृष्ट पद्धतीने साजरा करण्यात आला.
सूर्यनमस्कार दिन का साजरा केला जातो सूर्यनमस्कार घातल्याने काय शरीराला फायदे होतात,तसेच आजच्या धावपळीच्या युगात डायटिंग पेक्षा सूर्यनमस्कार किती गरजेचे व महत्वपूर्ण आहेत याची छान माहिती चौरे सरांनी विद्यार्थांना सांगितली.
इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सूर्याचे 12 मंत्र सादर करून सर्व मुलांनी सूर्यनमस्कारातील विविध प्रकारची ताडासन, हस्तउथानासन,पादहस्तासन, अश्व संचालनासन, चतुरंग दंडासन, अष्टांग नमस्कार, भुजंगासन, व अधोमुखश्वासासन, इ सर्व आसने व मंत्र यांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. सूर्यनमस्कार स्पर्धेत ज्या मुलांचे प्रथम क्रमांक आले होते अभिनंदन करून त्यांना शाबासकी देण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका मा. विश्रांती बनसोडे, उपमुख्याध्यापिका मा.स्वराली कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.