महाराष्ट्र
बलवडी येथे विठ्ठल रुक्माई चा शाही विवाह सोहळा संपन्न
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय व श्री विठ्ठल रुक्माई च्या जय घोषात वसंत पंचमी दिवशी ज्ञानेश्वर माऊली मंदिर बलवडी ता. सांगोला येथे विठ्ठल रुक्माई चा शाही विवाह सोहळा हजारो महिला पुरुष मंडळीच्या वऱ्हाडासह संपन्न झाला.श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला शुभ्र वस्त्र तसेच दागिने व अलंकार परिधान करून सजावट करण्यात आली होती तसेच आंतरपाट धरून मंगलाष्टका सुरुवात पुरोहित लिंग या स्वामी यांनी केली.
यावेळी डॉक्टर शिवाजीराव ढोबळे, शिवाजी गोरख शिंदे, राजेंद्र टिकोळे, गौरीहर टीकोळे हे सहकुटुंब उपस्थित होते तसेच असंख्य भाविक भक्त हजर होते. सदर कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय कारंडे व प्रकाश बदडे यांनी परिश्रम घेतले.