संपादक मोहन मस्के सर यांना राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार
ज्येष्ठ संपादक मोहन मस्के सर यांनी दैनिक माण दूत दैनिकांमधून तळागाळातील व सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून दिला व त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सीबीएस न्यूज चैनल तर्फे त्यांना राज्यस्तरी पत्रकार पुरस्कार देऊन सदानंद मल्टीपर्पज हॉल येथे गौरवण्यात आले आहे.
सदरचा पुरस्कार आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, ग्रामीण कथाकार आप्पासाहेब खोत, ज्येष्ठ अभिनेते महादेव शिरोळ कर, डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ माने, डिजिटल मीडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश सावंत, मुख्य संपादक चांद भैय्या शेख, कार्यकारी संपादक रविराज शेटे, उपसंपादक राजाभाऊ गुजले इ. शुभ असते मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, गुलाब पुष्प देऊन मस्के सर यांना गौरविण्यात आले आहे. यावेळी उपसंपादक सुनील मस्के, अमेय मस्के उपस्थित होते.