सांगोला(प्रतिनिधी):- उघड्या हॉलच्या दारातुन घरात प्रवेश करून बेडरुम मध्ये ठेवलेल्या उघड्या कपाटातील 3 लाख 90 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने कोणीतरी अज्ञात चोरट्याने पळवून नेली असल्याची घटना 2 फेबु्रवारी रोजी रात्रीच्या सुमारास चिकमहुद बंडगरवाडी ता.सांगोला येथे घडली. चोरीची फिर्याद अनिल बंडगर (वय 34 वर्षे, व्यवसाय शेती, रा. चिकमहुद बंडगरवाडी) यांनी दिली आहे.
चोरट्यांनी 1,75,000 रुपयांचे 3 तोळे 5 ग्रॅम वजनाचे गळ्यातील सोन्याचे गंठण , 75 हजार रुपये किंमतीचे 1 तोळे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, 1 लाख रुपये किंमतीचे 2 तोळे वजनाच्या प्रत्येकी एक तोळा प्रमाणे 2 सोन्याच्या पिळाच्या अंगठ्या, 25 हजार रुपये किंमतीचे 5 ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याची वेल व 15 हजार रुपये किंमतीचे 3 ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे झुबके असा एकूण 3 लाख 90 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरट्यांनी पळवून नेले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोहेका भोसले हे करीत आहेत.