आज पर्यंत आपण जात-पात, पक्ष पार्टी न पाहता जनतेची सेवा केली व मागील निवडणुकीत शेकाप व बापूस विजयी केले परंतु आपली यावेळी उमेदवारी असताना त्यांनी मदत केली नाही व त्यामुळे जनता जनार्दनाच्या पुढे आपण हा विषय सांगितला व त्यांनी होकार दिला त्यामुळे आपण विधानसभेसाठी उभे राहिलो असून मशाल चिन्हावरच बटन दाबून सर्वांनी मला विजयी करावे. व येत्या पाच वर्षात नाझरे, कोळा, घेरडी, महूद, भाळवणी इत्यादी गटात तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ असे मत नाझरे ता. सांगोला येथील प्रचार सभेत विधानसभेचे उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केले.
आपण निवडून आल्यानंतर सांगोला तालुक्यासाठी तीन गोष्टी करणार असून यामध्ये प्रथम सर्वांना शेतीचे व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊ, दुसरे 45 वर्षे झाली तरुणांची लग्न नाहीत, त्यांना रोजगार नाही व यासाठी तालुक्याच्या पाच गटात एमआयडीसी उभा करून सर्वांना रोजगार उपलब्ध करून देऊ. व रेशनिंग कार्ड तसेच इतर कामासाठी नागरिकांना सांगोल्याला हेलपाटी घालावे लागतात परंतु आपण गावातच अधिकारी बोलवून त्यांचे जागेवर काम करून देऊ व 50 हजार कोटीचा निधी आणून सांगोला तालुका सुजलाम सुफलाम करू व यासाठी आपणास विजयी करा असे आवाहनही दीपक आबा साळुंखे पाटील यांनी यावेळी केले. तसेच आमचे कार्यकर्ते शांत आहेत त्यांना धमकावू नका व तिरक्या नजरेने पाहू नका नाहीतर गाठ माझ्याशी आहे असेही आबांनी यावेळी सांगितले. यावेळी गौडवाडी येथील लहुजी पॅंथर सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी व शेकापच्या कार्यकर्त्यांनी आबांना पाठिंबा दिला व पक्षप्रवेश केला.
सदर प्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ अभंगराव, काँग्रेस कमिटीचे प्रांतिक सदस्य प्रा. प्रबुद्ध चंद्र झपके, बलवडीचे माजी सरपंच बाळासो शिंदे, लहुजी पॅंथर सेनेचे अध्यक्ष नितीन भाऊ रणदिवे, सचिव अभिषेक कांबळे, महिला अध्यक्ष जयश्री सावंत, नागेश रायचुरे, दादासो हरिअर इत्यादींनी दीपक आबांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी माजी सरपंच अशोक पाटील, विजय दादा येलपले, विनायक मिसाळ, एडवोकेट सत्यजित लिगाडे, समाधान शिंदे, बंडू मामा आदाटे, शिवाजी बनसोडे, अनिल खरात, बसवेश्वर आदाटे, अनिल जगदाळे, पांडुरंग वाघमारे, भैय्या काजी, लक्ष्मण पाटील,सुशांत आईवळे, रफिक काजी, वस्ताद बंडगर, शिवाजी निंबाळकर, आबा पवार, सुरेश रेड्डी, लक्ष्मण रेड्डी, शरद गुरव, जयसिंग पवार, आशिष सोनवणे, भारत तेली, प्रा. डी . के. पाटील, अण्णा वाकडे, पोपट खरात, महेश वाघमारे, विद्याधर मोहिते, सचिन दुकटे, सौ. सुलभा देशपांडे, सौ. सुमित्रा लोहार, महिला, ग्रामस्थ, लहुजी संघटनेचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.