सांगोला तालुका

अस्तित्व”संस्थेच्या वतीने दिवाळीत  गरीब व गरजू महिलांना साड्या व फराळाचे वाटप-शहाजी गडहिरे

 अस्तित्व संस्थेच्या वतीने विधवा व एकल महिलाना दिवाळी निमित्त साड्या व फराळाचे काल वाणी चिंचाळे,घेरडी, आलेगाव, हटकर मंगेवाडी तसेच सांगोला स्मशानभूमीतील घनसवाड कुटुंबाला वाटप करण्यात आले.
“अस्तित्व”ही सामाजिक संस्था नेहमी समाजातील वंचित, दुर्लक्षित घटक व महीला यांच्या विकासासाठी काम करीत असते. या वर्षी पाऊसमान कमी झाल्याने सध्या दुष्काळी परिस्थितीचे आव्हान आपल्यापुढे निर्माण झाले आहे त्याचा सर्वाधिक फटका समाजातील विशेषतः विधवा व एकल महिलाना बसतो आहे.दिवाळीच्या काळात अशा महिला स्वतःच्या गरजा बाजूला ठेऊन मुलाबाळांना कपडा लत्ता घेतात पण स्वताला साधी एखादी साडी पण आर्थिक परिस्थितीमुळे घेऊ शकत नाहीत अशा पार्श्वभूमीवर अस्तित्व संस्थेच्या  वतीने समाजातील गरीब व निराधार महिलांना दिवाळी निमित्त चांगल्या दर्जाच्या साड्या तसेच दिवाळी फराळाचे वाटप करण्यात येत असुन त्याची सुरुवात काल वाणी चिंचाळे तसेच घेरडी येथून करण्यात आली.
वाणीचिंचाळे येथे सरपंच प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते जितेन्द्र गडहिरे यांच्या व गावातील माजी सरपंच लक्ष्मण निळे, एड. विकास गडहिरे, राजेंद्र पवार, पत्रकार सचिन गायकवाड, ग्रा.पं.सदस्य सचिन गडहिरे, अशोक गंगाधरे गुरूजी, वामन बनसोडे, विशाल गडहिरे, प्रविण सुर्यागध, संकल्प गडहिरे, अजय गडहिरे, बंडू पाटील, शेखलाल शेख यांच्या तसेच घेरडी येथे जितेन्द्र जगधने, ग्रा.पं.सदस्या आरती जगधने यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यापुढेही पुढील दोन दिवस तालुक्यातील गरीब व निराधार महिलांना चांगल्या दर्जाच्या नवीन साड्या व फराळाचे पदार्थ देऊन या महिलाना दिवाळीत दिलासा देण्याचे काम संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. महिलाना साड्या वाटप या उपक्रमासाठी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले असून त्यांना वाटप कार्यक्रमात महिलांकडून व अस्तित्व कडून धन्यवाद दिले जात असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!