महाराष्ट्र
फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये राष्ट्रीय स्तरावरील टेक्नोफॅब 2K25 या टेक्निकल स्पर्धेचे आयोजन
सांगोला : सांगोला शहरातील फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये राष्ट्रीय स्तरावरील टेक्नोफॅब 2K25 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे.
या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यासाठी भरीव रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. टेक्निकल क्विझ , इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आयडिया ,ब्लाईंड सी,व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे डिप्लोमा मेकॅनिकल, सिव्हिल ,कंप्यूटर सायन्स अँड इंजिनियरिंग व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले असून सर्व अभियांत्रिकी महाविद्यालया मधील डिप्लोमा शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संखेने सहभाग नोंदविण्याचे आवाहन पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा.तानाजी बुरुंगले यांनी केले आहे.
या स्पर्धेसाठी संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर,मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर , कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, यांनी शुभेच्छा दिल्या असून या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यानी या स्पर्धेचे समन्वयक प्रा.अजयकुमार भोसले (८०१३१२१९८८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.