माणगंगा परिवार आणि सन मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने आज होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन
सांगोला(प्रतिनिधी):- माणगंगा परिवार आणि महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी सन मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांसाठी आनंदी नव्या नात्याची नांदी अर्थातच होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आज 27 जुन रोजी दुपारी 2.00 वाजता शिवशक्ती मंगल कार्यालय, कडलास रोड, सांगोला येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माणगंगा परिवाराचे संस्थापक श्री.नितीन (आबासाहेब ) इंगोले यांनी दिली.
सदर कार्यक्रमामध्ये विजेत्या महिलांसाठी पैठणी व इतर पारितोषिके देण्यात येणार आहेत.या कार्यक्रमासाठी निवेदक म्हणून विविध चित्रपटात आणि वाहिनी वरील कार्यक्रमात काम केलेले सुप्रसिद्ध श्री जयवंत भालेकर उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.