सांगोला तालुका

गौडवाडी येथे कौशल्यआधारित डाळिंब छाटणी प्रशिक्षण व हार्टसप अंतर्गत डाळिंब पिकावरील शेतीशाळा संपन्न

गौडवाडी(वार्ताहर):-दिनांक 22 फेब्रुवारी रोजी मौजे. गौडवाडी ता. सांगोला येथे नवनाथ माळी यांच्या डाळिंब प्लाटवर कृषि विभागाच्या वतीने आत्मा अंतर्गत कौशल्य आधारित डाळिंब छाटणी प्रशिक्षण कार्यक्रम व हार्टसप अंतर्गत डाळिंब पिकावरील शेतीशाळा वर्ग उप विभागिय कृषि अधिकारी श्री सर्जेराव तळेकर यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी उपविभागिय कृषी अधिकारी सर्जेराव तळेकर यांनी डाळिंब लागवड तंत्र , अन्नद्रव्य व्यवस्थापन , छाटणी तंत्रज्ञान , किड व रोग तसेच सुत्रकृमी व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. स्मार्ट अग्रीचे संस्थापक श्री गुणवंत गरड यांनी डाळिंब एक खोड तंत्रज्ञान, डाळिंब छाटणी व्यवस्थापन, पिन होल बोरर नियत्रण, मल्चिंगचा वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी तालुका कृषि आधिकारी शिवाजी शिंदे यांनी लागवडीचे अंतर, कलमांची निवड, पाणी व्यवस्थापन , डाळिंब भौगोलिक मानांकन नोंदणी, अनारनेट नोंदणी तसेच डाळिंबासाठी नविन अँन्टीहेल नेट योजनेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी गुणवंत गरड यांनी डाळिंब छाटणीचे प्रात्यक्षिकही करून दाखविले. यावेळी मंडळ कृषि अधिकारी भाग्यश्री पाटील, कृषी पर्यवेक्षक सतिष देठे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक मेघराज पोळ, कृषी सहाय्यक मयुर माळी ,डाळिंब उत्पादक शेतकरी व डाळिंब छाटणी करणारे कुशल मजुर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक कृषि पर्यवेक्षक सतिष देठे यांनी केले. तर आभार श्री नवनथ माळी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!