सांगोला तालुकाशैक्षणिक

सांगोला विद्यामंदिर इ.१२ वी  सी.ई.टी वर्गाची विद्यार्थी – पालक- शिक्षक सभा संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला व सांगोला परिसरामध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी व विद्यार्थ्यांना गुणात्मक व रचनात्मक शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने पूज्य बापूसाहेब झपके यांनी १९५२ मध्ये सांगोला विद्यामंदिरची स्थापना केली. स्थापनेपासून विद्यामंदिर गुणवत्तेत अग्रेसर आहे. सद्यस्थितीला बारावीनंतर घेतल्या जाणाऱ्या  स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळावे हा हेतू ठेवून सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे इयत्ता अकरावी व बारावी शास्त्र शाखेसाठी  सी.ई.टी.परीक्षा मार्गदर्शन केले जाते यानुसार  विद्यार्थ्यांची प्रगती आढावा,बोर्ड परीक्षा व सी.ई.टी परीक्षेच्या दृष्टीने विविध सूचना, मार्गदर्शन व अभ्यासासाठी प्रेरणा मिळावी या हेतूने  इयत्ता बारावी शास्त्र सी.ई.टी.वर्ग विद्यार्थी- पालक- शिक्षक सभा संपन्न झाली.
सुरुवातीला  प्रा. मिलिंद देशमुख यांनी बारावी बोर्ड परीक्षा व सी.ई.टी. परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी  पालक  राजेंद्र गायकवाड, मोरे ,बापूसाहेब पाटील व वंदना गायकवाड यांनी मनोगते व्यक्त केली.   या विद्यार्थी – पालक – शिक्षक सभेमध्ये उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते यांनी विद्यार्थी व पालकांच्या विविध  शंकाचे निरसन करून मार्गदर्शन केले. उपप्राचार्य शहिदा सय्यद यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययन करावे, अभ्यासाचे वेळापत्रक करून त्याची योग्य अंमलबजावणी करावी असे सांगत परीक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
या विद्यार्थी – पालक- शिक्षक सभेसाठी  सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे पर्यवेक्षक बिभिषण माने व  ज्युनिअर कॉलेज शास्त्र शाखेचे अध्यापक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या  सभेचे प्रास्ताविक प्रा.सागर बुधावणे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.आरती वेदपाठक यांनी  तर आभार प्रदर्शन प्रा.उल्हास यादव यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!