शैक्षणिकसांगोला तालुका

शिवणे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

शिवणे(वार्ताहर)-शैक्षणिक वर्ष 2022-23मधील इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शिवणे माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात भावुक वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमास कै. वामनराव शिंदे माध्यमिक कन्या प्रशाला,सांगोला चे मुख्याध्यापक श्री.रमेश पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले तर शिवणे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य विजयकुमार वाघमोडे हे अध्यक्ष स्थानी होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर विध्यार्थ्यांनी प्रशालेला भेट दिलेल्या तीन सिमेंट बाक,आणि  3 सिलिंग फॅनचा प्राचार्य विजयकुमार वाघमोडे यांनी स्वीकार केला. त्या नंतर विध्यालयातर्फे प्रमुख पाहुण्यांचा शाल ,फेटा,पुष्पहार देऊन आदरपूर्वक प्राचार्य विजयकुमार वाघमोडे यांचे हस्ते सत्कार करण्यांत आला.
त्यानंतर गौरी घाडगे, मेटकरी संदेश,सानिका घाडगे,वैष्णवी घाडगे,स्वप्नाली गडदे, प्रांजली पंढरे यांनी आपली मनोगते व्यक्त करून प्रशालेबद्दल  गौरवउद्गार काढले व शाळेच्या ऋणात कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली.
शिक्षकांमधून श्री.सुनील पाटील,श्रीमती मीरा देशमुख, परिचर मारुती सिद यांनी उपदेशपर भाषणे केली आणि परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख मार्गदर्शक मुख्याध्यापक श्री.रमेश पवार यांनी आपल्या मनोगतात मराठी साहित्यातील अनेक कवितांचा आधार घेत,अनेक वैज्ञानिकांची उदाहरने देत तारुण्याच्या उंबरठयावरील जीवनाची योग्य जडण घडण होण्यासाठीआपणामध्ये  जोपर्यंत जाणीव व जागृती होत नाही तोपर्यंत काहीही घडू शकत नाही असे सांगत जीवनात ध्येय आणि काही तत्वांना स्वीकारले पाहिजे ही आपणास अनेक थोर व्यक्तींच्या चरित्रात मिळतात यासाठी भरपूर वाचन केले पाहिजे .असे विचार मांडले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य विजयकुमार वाघमोडे म्हणाले की,प्रशालेने संस्काराची शिदोरी तुम्हास दिली असून त्याचा उपयोग अनेक माजी विधर्थ्यांनी करून स्वतःला सिद्ध केले आहे त्यांचा आदर्श घेऊन आपणही काहीतरी बनून स्वतःच आणि प्रशालेचे नाव उज्वल करावे.यासाठी विशिष्ट ध्येय उराशी बाळगून जिद्दीने कष्ट करावे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत नरळे यांनी केले तर आभार प्रा.शोभनतारा मेटकरी यांनी मानले.इयत्ता पाचवीच्या मुलींनी निरोप गीत म्हटले.शेवटी सर्वाना विद्यालयातर्फे खाऊ वाटप करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!