फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये TCS ऍप्टिट्यूड कार्यशाळा संपन्न

येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी TCS ऍप्टिट्यूड कार्यशाळा संपन्न झाली.या कार्यशाळेसाठी मा. रोहित रुणवाल संचालक मॅड लर्निंग यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे मल्टी नॅशनल कंपनी मध्ये निवड होण्याची शक्यता, विविध स्पर्धा परीक्षा मध्ये यश, निर्णय क्षमतेत वाढ, क्रिएटिव्हिटी लॉजिकल थिंकिंग विकास अश्या प्रकारचे विविध फायदे होतात या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. चेतन पतंगे व प्रा. श्रीनिवास माने (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग) यांनी केले.
तसेच संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक दिनेश रुपनर, परिसर संचालक डॉ. संजय आदाटे व फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. संजय बैस यांचे मार्गदर्शन लाभले व पुढेही अशी कार्यशाळा घेऊ अशी ग्वाही दिली.