शैक्षणिकसांगोला तालुका

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या इ.१०वीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या इ.१०वी च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री. भिमाशंकर पैलवान उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु.सरिता कापसे मॅडम, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री. पैलवान सर म्हणाले की,विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना इतरांना मदत, सहकार्य करण्याची वृत्ती बाळगली पाहिजे गरजूंना मदतीचा हात दिला पाहिजे तसेच आपली संगत चांगली ठेवावी व सेवा, सत्संग, स्वाध्याय ही त्रिसूत्री अंगीकारावी तसेच विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा त्याचबरोबर दररोज किमान एक तास आपण मैदानावर खेळावे यामुळे आरोग्य चांगले राहते. भविष्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपलं क्षेत्र निवडताना आपल्याला जे क्षेत्र आवडत त्या क्षेत्रामध्ये जावे. त्याचबरोबर यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे प्रचंड आत्मविश्वास असला पाहिजे.
हे सांगताना त्यांनी अनेक उदाहरणे, गोष्टी सांगितल्या. याबरोबरच इ.१०वी च्या परीक्षेला कशा प्रकारे सामोरे जावे याबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी श्री.संगमेश्वर घोंगडे व इ १०वीच्या विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.लता देवळे यांनी केले तर कु. पल्लवी थोरात यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!