सांगोला तालुका

नागरिकांनी , व्यापार्‍यांनी प्लास्टिकचा वापर करू नये-मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी दोन दुकानावर कारवाई; 7400 रुपयांचा दंड

सांगोला नगरपरिषद आरोग्य विभागामार्फत शहरामध्ये प्रतिबंधित प्लास्टिक जप्ती मोहीम राबविण्यात येत असून याकरता टास्क फोर्स ची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नागरिकांनी , व्यापार्‍यांनी प्रतिबंधित प्लास्टिक थर्माकोल याचा वापर करू नये, तसेच शहर प्लास्टिक मुक्त ठेवावे असे आवाहन नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी यांचेकडून करण्यात आले.
शहरामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेले थर्माकोल, सिंगल युज प्लास्टिक, प्लास्टिक कॅरीबॅगज याचा वापर व्यापारी नागरिक यांनी करू नये. जे नागरिक, व्यापारी प्रतिबंधित प्लास्टिक, थर्माकोल यांचा वापर करतील अशा नागरिकांवर, व्यापार्‍यावर शासनाने ठरवून दिलेली कारवाई करण्यात येईल. सध्या शहरांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिक जप्ती मोहीम, शहरांमध्ये घंटागाडीत कचरा न टाकता इतर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार्‍या वर नगर परिषदेमार्फत कारवाई करण्यात येणार आहे. प्लास्टिक बंदी अंतर्गत शहरातील 89 दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यामधील दोन दुकानावर कारवाई करण्यात आली असून रक्कम रुपये 7400/-दंड करण्यात आलेला आहे.
सदर मोहिमे अंतर्गत आत्तापर्यंत दीडशे किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. या टीममध्ये गणेश गळीयल, निलेश कांबळे, अनिकेत चंदनशिवे, आशिष बनसोडे, प्रफुल्ल धनवडे, स्वच्छता निरीक्षक विनोद सर्वगोड हे कर्मचारी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!