सांगोला तालुका

काळुबाळुवाडी येथे अपघात; 1 जण जागीच ठार

सांगोला (प्रतिनिधी): दुचाकीवरून मजुरीसाठी निघालेल्या दोघांना पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या बोलेरो गाडीने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. चंद्रकांत जाधव रा. भिलवडी असे अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात 24 फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास काळुबाळुवाडी ता. सांगोला येथे घडला. अपघातानंतर बोलेरो चालक पळून गेला.याप्रकरणी जालिंदर जाधव यांनी अज्ञात बोलेरो चालकाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी, भिलवडी येथील चंद्रकांत जाधव हा मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. 23 फेब्रुवारी रोजी रात्री 8 च्या सुमारास चंद्रकात हा भिलवडीवरुन त्याची सासरवाडी बुधगाव ता.मिरज येथे गेला होता. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी पाचच्या सुमारास चंद्रकांत जाधव व बाबुल गोसावी रा बुधगाव असे दोघेजण मोटरसायकल वरुन मजुरी करीता सांगोला येथे निघाले होते.दरम्यान मिरज ते सांगोला रोडवरील काळुबाळुवाडी येथे पाठीमागून येणार्‍या बोलेरो गाडीवरील अज्ञात चालकाने गाडी भरधाव वेगात चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन चंद्रकांत जाधव यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात चंद्रकांत जाधव यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच मयत झाला. तर बाबुल गोसावी याच्या डोक्याला मार लागला असून या अपघातामध्ये मोटारसायकलचे अंदाजे 5 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर बोलेरो चालक पळून गेला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!