युवक नेते संतोष करांडे यांच्या वाढदिवसानिमित्त 174 रुग्णांची नेत्र तपासणी

सांगोला(प्रतिनिधी):-कोळा ता. सांगोला येथील नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे युवक नेते संतोष करांडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कै. अॅड. अशोकराव देशमुख युवा मंच, श्री. लक्ष्मी देवी प्रतिष्ठान, पैलवान ग्रुप कोंबडवाडी व सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कोळा येथील श्री.. लक्ष्मी देवीच्या मंदिरामध्ये मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोळा व परिसरातील 174 नेत्र रुग्णांनी याचा लाभ घेतला.
अनावश्यक खर्चाला फाटा देत नेहमीच आपल्या वाढदिवसाला सामाजिक, धार्मिक कार्यक्रम घेवुन आपला वाढदिवस साजरा करणारे कोळे युवक नेते संतोष करांडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबीर घेवुन युवा पिढी समोर आदर्श निर्माण केला आहे. या शिबीराचे उद्घाटन लोकप्रिय मा. जि.प. सदस्य अॅड. सचिन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुदर्शन हॉस्पीटलचे सुरेश वाघ, खरेदी विक्री संघाचे मा.चेअरमन विलासराव देशमुख, मा.पं.स. सदस्य सिताराम सरगर, जेष्ठ नेते तुकाराम (दादा) आलदर, खरेदी विक्री संघाचे मा. संचालक रफिक तांबोळी, राजेंद्र देशमुख, मा. सरपंच शहाजी हातेकर, मा. उपसरपंच दगडु कोळेकर, अरुण बजबळकर, सोपान कोळेकर, हरी (भाऊ) सरगर, चेअरमन कुंडलिक आलदर सर, मारुती सरगर सर, शिवाजी हातेकर, शिवाजी आलदर, बिरा आलदर, रमेश कोळेकर, विष्णु सरगर, सुभाष केंगार, तुषार माने, नितीन देशमुख, उध्दव करांडे, मुरलीधर करांडे, प्रकाश करांडे आदि मान्यवर उपस्थित होते.
या शिबीरामधुन 14 लोकांना डोळ्यांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी सांगली येथे पाठवण्यात आले असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवास करांडे, महादेव करांडे, दादा करांडे, तानाजी पांढरे, संपत करांडे, बंडु करांडे, भगवान करांडे, दत्तात्रय करांडे, मेजर ओंकार करांडे, अनिल करांडे, अमोल करांडे यांच्यासह सुदर्शन हॉस्पिटल सांगली यांनी विशेष परिश्रम घेतले.

युवक नेते संतोष करांडे यांना दिवस भरात माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे, मा. आमदार दिपक आबा साळुंखे पाटील, आ. जयंत भाई पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब देशमुख, आ. बाळाराम पाटीलम, आ. बच्चु कडू, आ. राम शिंदे, महिला आघाडीच्या रायगड जिल्हाध्यक्षा चित्रलेखा पाटील, राष्ट्रवादीचे नेते बिज्जु आण्णा प्रधाने, जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष, बाबासाहेब करांडे आदिंनी सोशल मिडियाव्दारे शुभेच्छा दिल्या.