क्राईमसांगोला तालुका

खवासपुर गावातील भर चौकात खुलेआम मटका, दारु विक्री व जुगार सुरू; तातडीने कारवाई न केल्यास ग्रामस्थ जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालया समोर आंदोलन करणार

खवासपुर (वार्ताहर ):-खवासपुर गावातील सांगोला रोडवर असलेल्या मुख्य चौकात अनेक दिवसांपासून खुलेआम मटका व जुगार सुरू असुन यामुळे अनेक तरुणांना वाईट छंद लागले आहेत.सांगली व सोलापूर जिल्ह्यातील हद्दीवर हे गाव असल्याने आसपासच्या गावातील अनेक लोक येथे मटका खेळण्यासाठी येत आहेत. शरिराला अतिशय घातक असलेली हातभट्टीची दारु विक्री सुध्दा राजरोसपणे सुरू आहे. दारु विक्री वर कारवाईचा केवळ दिखाऊ पणा करण्यासाठी जे दारू विक्री करतात ते सोडून जे असले अवैध धंदे करत नाहीत दुसरीकडे छापा टाकला जातो व केवळ कारवाईची फार्स केला जातो.
आर्थिक नुकसान व अनेक लोक कामधंदे सोडून मटका खेळत असल्याने अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याने नागरिकांना या सर्व गोष्टींचा त्रास होत आहे विशेषतः महीलांनी  व ग्रामस्थांनी वेळोवेळी सांगुनही पोलीस प्रशासन डोळेझाक करतना दिसत असल्यामुळे यामुळे नागरिक त्रस्त झाले  आहेत यावर तातडीने कारवाई न केल्यास जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालया समोर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी गावातील ग्रामस्थ व महीलांनी सांगितले सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!