सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

सांगोला भुयारी गटारी योजनेच्या कामाला मंजुरी- आमदार शहाजीबापू पाटील,

मागील १२वर्षापासून रेंगाळत असलेल्या सांगोला शहर भुयारी गटार योजनेच्या कामाला अखेर मंजुरी मिळाली असून काल शुक्रवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी ९६ कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली

सन २०११ पासून प्रलंबित असलेल्या सांगोला शहर भुयारी गटारी योजनेच्या कामाला मंजूर मिळण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आमदार झाल्यापासून सातत्याने पाठपुरावा केला होता सुरुवातीला ५०कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या योजनेचा खर्च आता १२५ कोटी रुपयांपर्यंत गेला असून त्यामधील टप्पा क्रमांक १च्या ९६कोटी ६३ लाख रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार शहाजीबापूंच्या मागणीला मान्यता देऊन निधी मंजूर केला आहे
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत या योजनेला मंजुरी मिळाली असून पहिल्या टप्प्याच्या कामासाठी एकूण ९६ कोटी ६३ लाखांना मंजुरी मिळाली आहे यामध्ये ८६ कोटी ९६लाख रुपये महाराष्ट्र शासनाकडून अनुदान मिळणार असून उर्वरित ९कोटी ६६ लाख रुपये सांगोला नगरपरिषदेला द्यावे लागणार आहेत
पहिल्या टप्प्यामध्ये सांडपाणी प्रक्रिया क्षमता,विविध ठिकाणी सांडपाणी गोळा करण्याची व्यवस्था करणे जलशुद्धीकरण केंद्राजवळ सांडपाण्यावर प्रक्रिया करणे यामध्ये ट्रंकमेन, पंपिंग स्टेशन, जलशुद्धी केंद्र व नालाबंध ही कामे पूर्ण करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यामध्ये मल वाहिन्यांची व्यवस्था करून पहिल्या टप्प्यांमध्ये निर्माण केलेल्या मलप्रक्रिया व्यवस्थेस जोडण्यात येणार आहे सदरचे काम सांगोला नगरपरिषदेमार्फत करण्यात येणार असून या साठी लवकरच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानून आमदार शहाजीबापू पाटील यांनी सदरच्या योजनेच्या कामाला दोन महिन्यांमध्ये सुरुवात केली जाणार असून चांगल्या कंत्राटदारांकडून गुणवंतापूर्वक काम वेळेत करून घेणार असल्याचे सांगितले
बऱ्याच वर्षापासून रेंगाळलेल्या सांगोला शहर भुयारी गटार योजनेच्या कामाला मंजुरी मिळाल्याने सांगोला शहरातील आरोग्याचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे यामुळे शहराच्या विकासामध्ये मोठी भर पडणार असल्याने गटारीचे काम झाल्यावर लगेच शहरातील सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी नवीन योजना मंजूर करणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापु पाटील यांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!