महाराष्ट्र

ध्येयवेडा शिक्षक श्री विजयसिंह घाडगे यांचा  ‘कृतज्ञता सोहळा’ शालेय स्पर्धा परिक्षा परिवारा मार्फत उत्साहात संपन्न

सांगोला:-सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे ज्ञान असणे आवश्यक आहे यासाठी श्री विजयसिंह घाडगे यांनी विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरील असणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी ‘शालेय स्पर्धा परीक्षा’ या नावाने मोफत क्लास घेतले होते.
श्री विजयसिंह घाडगे सर हे मागील तीन वर्षापासून शालेय स्तरावर असणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी मोफत क्लासेस चालवतात यातून अनेक विद्यार्थी राज्य व जिल्हा स्तरावर चमकलेले आहेत. श्री घाडगे सर शालेय वेळेनंतर दीड ते दोन तास विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करत असत. दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सर्व शिक्षण प्रेमी पालक व विद्यार्थी यांच्या वतीने श्री घाडगे सर यांचा कृतज्ञता सोहळा हॉटेल फाईव्ह स्टार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्कॉलरशिप व मंथन स्पर्धा परीक्षा मध्ये हातखंड असणारे श्री चतुरगुण औताडे सर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाप्रसंगी सर्व पालकांच्या वतीने श्री विजयसिंह घाडगे सर यांचा सपत्नीक शाल व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे श्री औताडे सर यांचाही सत्कार करण्यात आला. उपस्थित असणाऱ्या सर्व पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौ सरला शिर्के मॅडम यांनी केले. उत्कर्ष क्षीरसागर, शौर्यन चंदनशिवे, अनुश्री तेली व विराज सूर्यवंशी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून सरांचे आभार मानले. पालकांमधून श्री ज्ञानेश्वर इंगोले, प्रथमेश गावडे, सतीश सपताळ, हेमंत बाबर ,बजरंग इंगोले व माधुरी घाडगे मॅडम यांनी सरांच्या कामाबद्दल मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे श्री औताडे सर यांनी विद्यार्थ्यांची परस्पराशी तुलना करू नये असे सांगितले. श्री घाडगे सर यांनी सर्व पालकांचे आयोजित केलेल्या सत्कार बद्दल आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उत्कर्ष चंदनशिवे व आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर बाबर सर यांनी केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी पालक म्हणून सुभाष क्षीरसागर, हेमंत बाबर, ज्ञानेश्वर इंगोले, सतीश सपताळ, ज्ञानेश्वर बाबर, नागेश तेली, धनाजी शिर्के, प्रथमेश गावडे, भाऊसो सूर्यवंशी, बजरंग इंगोले, राजू कोरे, उत्कर्ष चंदनशिवे,चैतन्य फुले, संतोष टकले, गणेश रणदिवे, अतुल इंगवले, राहुल कोरे,अमर गोसावी, विशाल दौंडे, संतोष गोरे,चेतन चंदनशिवे, चौरे सर व दैनिक  माणदूतचे संपादक श्री मोहन मस्के व अमेय मस्के उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सरांचे विद्यार्थी व माता पालक वर्ग उपस्थित होता कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button