सांगोला तालुका

*श्रीरामप्राणप्रतिष्ठा निमित्त वाटंबरे येथे ग्रामस्वच्छता*

 २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनाचे औचित्य साधून प्रत्येक गावकऱ्यांनी आपआपल्या गावांमध्ये अयोध्या वरून आलेले अक्षदा वाटप करून मंगल कलशासह नगरप्रदक्षिणा काढून अतिशय उत्साही वातावरणात या कार्यक्रमाची आयोजन केले.
यावेळी प्रभु श्रीरामांचा जयघोष करण्यात आला.सोमवारी सकाळी १०वा.सुश्राव्य असे किर्तन सेवेचे आयोजन ग्रामदैवत खंडोबा मंदिर येथे केले आहे.वाटंबरे गावाठाणातील सर्व मुख्य रस्ते गावातील सर्व मंदिरे स्वच्छ करण्यात आली.स्वच्छतेसाठी गावातील ग्रामस्थ व माध्यमिक विद्यालयातील मुलां-मुलींनी मध्यान्ह नंतर मोलाचे सहकार्य केले.तरी कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्यासाठी श्रीरामभक्तांनी आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!