sangola

पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज : पावसाचा जोर ओसरणार, फवारणी करताना शेतकऱ्यांनी…

HTML img Tag Simply Easy Learning    

सध्या राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस होतोय. राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. अशात पुढेही पावसाचा जोर असाच राहणार आहे की येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी होऊ शकतो? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. या सगळ्याचं उत्तर हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलं आहे. पावसाचा जोर ओसरणार असल्याचं पंजाबराव डख यांनी सांगितलं आहे. 24 जुलै राज्यामध्ये सर्वदूर झडीचं वातावरण असणार आहे. पावसाचा जोर काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी चांगला असेल. शेती उपयुक्त असा पाऊस पडणार आहे, असं पंजाबराव डख यांनी सांगितलं आहे.

 

छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये येत्या दोन दिवसात पावसाचा जोर कमी होणार आहे. उद्या या भागात पाऊस कमी होईल. ढगाळ वातावरण नसेल. त्यामुळे स्थानिकांना सूर्यदर्शन दोन तासासाठी किंवा तीन ते चार तासांसाठी होऊ शकतं. पुढचे पंधरा दिवस रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि इतर कोकण किनारपट्टी प्रदेशात सुदर्शन शक्यता खूप कमी आहे. या भागांमध्ये काही मोजक्या तालुक्यांमध्ये पाऊस राहणार आहे, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे…

बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, हिंगणघाट, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, वाशीम, वर्धा या जिल्ह्यांमध्येही 25 जुलै आणि 26 जुलै सूर्यदर्शन होणार आहे. पण ते दोन तास किंवा तीन तासासाठी असेल. त्यामुळे हे दिवस शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असतील. फवारणीसाठी योग्य दिवस आहेत. पण दुपारनंतर पाऊस येईल त्याप्रमाणे फवारणीचं नियोजन करावं, असं पंजाबराव डख यांनी सांगितलं आहे.

 

कमी-अधिक प्रमाणात पाऊस

नाशिक, अहमदनगर, पंढरपूर, पुणे, सातारा या जिल्ह्यांसाठी 25, 26, 27 च्या काळामध्ये थोड्याफार प्रमाणात सुर्यदर्शन होईल. एक तास दोन तासासाठी इथे पावसाचा जोर कमी होईल. त्यामुळे सूर्यप्रकाश जमीनीवर पडेल. आभाळ भरून दुपारनंतर वातावरण निर्माण होईल. पाऊस बऱ्याच ठिकाणी चांगला राहील. पुढचा आठवडाभर पावसाचं वातावरण राहील. सोलापूर, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यात सर्व ठिकाणी पाऊस राहील. काही ठिकाणी दुपारनंतर तर काही मध्य रात्रीपर्यंत पाऊस पडेल. दिशा बदलून पाऊस पडेल. पण दिनांक 23-25 जुलै पर्यंत सर्व ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस राहील, असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!