जि. प. प्राथ. शाळा मुजावर पिरजादेवस्ती शाळेमध्ये शिक्षण सप्ताह अंतर्गत क्रीडा दिवस साजरा

सांगोला :- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 21 जुलै ते 28 जुलै दरम्यान शिक्षण सप्ताहाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहेत.जि. प. प्राथ शाळा मुजावर पिरजादेवस्ती शाळेत मोठ्या उत्साहात शिक्षण सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.दिवस तिसरा क्रीडा दिवस या उपक्रमांतर्गत क्रीडा प्रतिज्ञा घेण्यात आली.
मुलांना खेळाचे महत्व सांगण्यात आले. त्यानंतर सापसीडी, कॅरम, गजगे, आईच पत्र हरवलं असे बैठे खेळ तर धावणे, लंगडी, आंधळी कोशिंबीर असे मैदानी खेळ घेण्यात आले. तसेच लिंबू चमचा, तीन पायांची शर्यत, पोत्यातील उड्या, ससा उडी, बेडूक उडी अशा
विविध स्पर्धा घेण्यात आल्या. मुलांनी खेळचा खुप आनंद लुटला. सर्व मुले खुप उत्साहाने सर्व उपक्रमात सहभागी झाले.त्यासाठी केंद्रप्रमुख सौ. जाधव मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच मुख्याध्यापिका श्रीमती.जिरगेमॅडम व उपशिक्षिका सौ. पिरजादेमॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.