सांगोला येथे श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीचे उद्घाटन

सांगोला (प्रतिनिधी):- श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी लि.आजरा (मल्टी-स्टेट) प्रधान कार्यालय गडहिंग्लज या संस्थेच्या 13 व्या शाखेचा सांगोला येथे आज 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता ज्योतिर्लिंग कॉम्पलेक्स वाढेगाव नाका येथे उद्घाटन सोहळा आयोजीत करण्यात आला असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष एम.एल.चौगुले व सांगोला शाखा चेअरमन डॉ.डी.एन.काशीद यांनी दिली.
13 व्या शाखेचे उद्घाटन प्रसंगी मंगळवेढ्याचे प्रांताधिकारी श्री.बी.आर. माळी ,करमाळा तहसिलदार सौ. शिल्पा घोंगडे, सांगोला तहसिलदार श्री. संतोष कणसे,श्री. बाबुराव गायकवाड, प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, डॉ.अनिकेत देशमुख, सांगोला शाखेचे चेअरमन प्रा. डॉ. डी. एन. काशीद संस्थेचे सर्व संचालक, शाखा चेअरमन, सल्लागार, सीईओ श्री. डी. के. मायदेव, सर्व सभासद, हितचिंतक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अवघे 10 हजार भागभांडवल आणि 18 सभासदावर सुरु झालेल्या या संस्थेचे 31 जुलै, 2024 अखेर 12853 सभासद, रु.13 कोटी 89 लाख भागभांडवल, 457 कोटीच्या ठेवी, 334 कोटीची कर्ज वितरण केली आहेत. 162 कोटीची गुंतवणूक असून एकूण संमिश्र व्यवसाय तब्बल 939 कोटीचा आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षात 500 कोटी ठेवीचा टप्पा पार करुन संमिश्र व्यवसाय 1000 कोटीच्या वर नेण्याचा संकल्प केला आहे.
18 मार्च, 2015 रोजी  संस्थेला मल्टीस्टेट दर्जा मिळाला. सध्या महाराष्ट्र, कर्नाटक व दिल्ली असे संस्थेचे कार्यक्षेत्र आहे. आम्ही गोवा राज्याचे कार्यक्षेत्र मिळविण्याच्या प्रयत्नात आहोत. कोल्हापूरसह सीमाभागातील अनेक मंडळी नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने सांगोला परीसरात असून ते संस्थेचे सभासद आहेत. त्यांच्या मागणीमुळेच आम्ही आपल्या सेवेसाठी सांगोला नगरीत आमची शाखा सुरु करत आहोत, गडहिंग्लज येथे संस्थेचे सुसज्ज प्रधान कार्यालय असून सध्या आजरा, गडहिंग्लज, चंदगड, नेसरी, कोल्हापूर, जयसिंगपूर, बेळगाव, निपाणी, कुडाळ, सांगली, पुणे व कराड अशा 12 शाखा आहेत. त्यापैकी गडहिंग्लज, कोल्हापूर, जयसिंगपूर, कुडाळ, सांगली, पुणे व कराड शाखा स्वमालकीच्या इमारतीत आहेत. संस्थेत आजअखेर एकूण 142 कर्मचारी आहेत. त्यांना 6 व्या वेतन आयोगानुसार वेतन देत आहे.
सर्व शाखेत आरटीजीएस, एनईएफटी, मायक्रो एटीएम, डेबीट कार्ड, मोबाईल बैंकोंग, क्यूआर कोड, लॉकर व वीज बिले भरण्याची सुविधा आहे. संस्थेच्या कामकाजाची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असल्यामुळे तसेच आठवड्यातून रविवार एकच दिवस सुट्टी असल्याने सभासद आणि व्यावसायिक, नोकरदार व ग्राहकांची मोठी सोय झाली आहे. कोअर बैंकिंग प्रणालीव्दारे सर्व शाखा एकमेकांना जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे सभासद व प्राहकांना कुठल्याही शाखेतून आपले व्यवहार करण्याची सोय उपलब्ध झाली आहे गंभीर आजारी व वयोवृध्द ग्राहकांना घरपोच सेवा दिली जाते.सर्व सभासद, संचालक आणि कर्मचारी उच्चशिक्षित आहेत, सुज्ञ आहेत, सर्वांच्या एकजुटीच्या प्रयत्नामुळेच संस्थेची आजवरची वाटचाल यशस्वी झालो आहे. रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केलेल्या आमच्या संस्थेच्या आजवरच्या सर्व निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. किंबहुना, तीच आमच्या कामाची पोहच पावती ठरावी,
रवळनाथ ही ’सहकारी तत्त्वावर हौसिंग फायनान्स क्षेत्रात काम करणारी देशातील एकमेव मल्टी-स्टेट संस्था आहे. राष्ट्रीय सहकारी संघाचे सदस्यत्वही आम्ही स्वीकारले आहे. त्यामुळे सभासद, संचालक व कर्मचारी यांच्या प्रशिक्षणासाठी, अभ्यास दौर्‍यासाठी संस्थेच्या डिजिटलायझेशनसाठी मिळून गेल्या 4 वर्षात 24 लाखाचे अनुदानही आम्हाला मिळाले आहे. या माध्यमातून सभासदांचे ’हक्क आणि कर्तव्ये’ याविषयी जागृत्तीची मोहिम सुरु असून संचालक अभ्यास दौर्‍याच्या निमित्ताने गुजरात, तामिळनाडू व केरळ येथील उत्कृष्ठ सहकारी संस्थाना संचालकांनी भेटी देऊन तेथील कामकाजाची पाहणी करून त्याप्रमाणे रवळनाथ मध्येही अद्ययावत कामकाजाची पध्दत सुरु केली आहे.
संस्थेचे ब्रेड अ‍ॅम्बेसिडर व परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव व माजी राजदुत आदरणीय डॉ.ज्ञानेश्वर मुळे आणि रवळनाथ संस्थेशी जोडलेले अनेक मान्यवर यांचे आम्हांस सहकार्य व मार्गदर्शन वेळोवेळी मिळते आहे. आमच्या कर्जदारांनाही पंतप्रधान आवास योजनेचे अनुदान मिळावे आणि संस्थेच्या कार्यक्षेत्रात गोवा राज्याचा समावेश व्हावा यासाठीही प्रयत्न सुरु असल्याचे संस्थापक अध्यक्ष एम.एल.चौगुले यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button