सांगोला तालुकाक्राईम

भरधाव माल ट्रक वरील ताबा सुटल्याने अपघात; महिलेचा मृत्यू

सांगोला – चालकाचा भरधाव माल ट्रक वरील ताबा सुटल्याने विवाह कार्य उरकून घराकडे जाण्यास रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मायलेकीस जोराची धडक दिली . अपघातात गंभीर जख्मीं झालेल्या महिलेचा उपचारापूर्वी मृत्यू  झाला तर तिची लहान मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर पंढरपुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान अपघातानंतर मालट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. हा अपघात काल बुधवार ३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास सांगोला – जत रोडवरील सोनंद ( पिंपरी मळा ) येथे घडला. दिपाली श्रीकांत बाबर  वय ,२९रा. डोंगरगाव ता. सांगोला असे मृत महिलेचे नाव असून हिंदवी श्रीकांत बाबर वय,२.५ असे जखमी बालिकेचे नाव आहे याबाबत, श्रीहरी भाऊसो काशीद रा. सोनंद ता. सांगोला यांनी फिर्यादी असून पोलिसांनी चालक सोमनाथ निवृत्ती जाधव रा. कासुर्डी ता. दौंड जि. पुणे यांचेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत , फिर्यादी श्रीहरी काशीद यांची डोंगरगाव येथील मृत बहीण दिपाली बाबर व तिची लहान मुलगी हिंदवी बाबर असे दोघी मायलेकी मंगळवार २ जानेवारी रोजी सोनंद ता सांगोला येथे लग्नकार्यासाठी आल्या होत्या. लग्न उरकून त्या दोघी पुन्हा काल बुधवार ३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास डोंगरगावला जाणेसाठी सांगोला ते जत जाणाऱ्या रोडवरील पिंपरी मळा येथे रस्त्याच्या कडेला थांबल्या होत्या त्या दरम्यान जत कडून सांगोल्याकडे भरधाव जाणाऱ्या एम एच -१२- एलटी -००३६  या मालट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने मायलेकीना जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघी मायलेकीना तातडीने उपचार करता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता जख्मी दिपाली बाबर या महिलेचा उपचारापूर्वी मृत्यू झाला तर जख्मीं  लहान बालिका हिंदवी बाबर हिस पुढील उपचाराकरता  पंढरपूर येथे हलविले असून, तिचीही प्रकृती चिंताजनक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!