सांगोला तालुका

मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्राच्या वतीने नाझरा विद्यामंदिर मध्ये किशोरवयीन मुलींसाठी उद्बोधन शिबिर संपन्न

नाझरा(वार्ताहर):- भारतीय स्त्री शक्ती संचलित मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्र सांगोला व नाझरा विद्यामंदिर प्रशाला  यांच्यावतीने नाझरा येथील श्रीकृष्ण मंदिरात किशोरवयीन मुलींसाठी उद्बोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारणी सदस्य शीलाकाकी झपके  उपस्थित होत्या,यावेळी व्यासपीठावर मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्राच्या अध्यक्षा विधीज्ञ राजेश्वरी केदार,मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्राच्या कार्यवाहक वसुंधरा कुलकर्णी,समुपदेशक अंजली पवार, नाझरे गावच्या सरपंच दिपाली देशमुख, ग्रामपंचायत सदस्या सुमित्रा लोहार, नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सिमरन काझी आदी उपस्थित होते. या उद्बोधन शिबिराचे उद्घाटन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने संपन्न झाले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून उद्बोधन वर्गाची विस्तृत माहिती व नियोजन प्राचार्य अमोल गायकवाड यांनी स्पष्ट केले. त्यानंतर  विधीज्ञ राजेश्वरी केदार यांनी मुलींसाठी असणाऱ्या विविध प्रकारच्या कायद्यांची माहिती दिली, त्याचबरोबर मुलींमध्ये आत्मविश्वास असेल तर कोणत्याही संकटाला आपण धैर्याने सामोरे जाऊ शकतो असा विश्वास  विविध उदाहरणांच्या माध्यमातून दिला. त्याचबरोबर सोशल मीडियाचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा यावेळी त्यांनी विविध सायबर गुन्ह्यांची माहिती मुलींना दिली.वसुंधरा कुलकर्णी यांनी मुलींच्या आरोग्याबाबत विस्तृत माहिती देत आपले आरोग्य हीच आपली सर्वात मोठी संपत्ती असल्याचे स्पष्ट केले. अध्यक्षीय मनोगतातून शीला काकी झपके यांनी नाझरा विद्यामंदिर च्या वतीने राबवण्यात आलेल्या या उद्बोधन वर्गाचे कौतुक करत उपस्थित मुलींना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्राचे सांगोला तालुक्यात असणारे विविध प्रकारचे कार्य उपस्थितांना त्यांनी स्पष्ट करून सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती काशीद यांनी केले तर आभार मंजुश्री ओतारी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. रवीना भिंगारदेवे प्रा. विद्या बंडगर यांच्यासह प्रशालेतील व ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
फोटो पाठवत आहे
One attachment • Scanned by

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!