सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ निर्मितीसाठी सहकार्य करणार- आ. शहाजीबापू पाटील

वृत्तपत्र विक्रेत्यांचे वेदांत हॉस्पिटलमध्ये सर्व रोग निदान शिबिर संपन्न

सांगोला (प्रतिनिधी):- संपादक, पत्रकार व वाचक यांचा वृत्तपत्र विक्रेता हा दुवा असून पेपरला आलेली बातमी वाचकापर्यंत पोहोचविण्याचे काम वृत्तपत्र एजंट करतात परंतु याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समक्ष भेटून कोरोना काळात एजंट यांचे फार मोठे योगदान आहे यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापन करा असे सांगून आवाज उठविणार असल्याचे मत आमदार शहाजीबापू पाटील यांनी वृत्तपत्र विक्रेता सांगोला शहर व ग्रामीण यांच्यासाठी वेदांत हॉस्पिटल सांगोला येथे भरविण्यात आलेल्या रोगनिदान शिबिरात व्यक्त केले. प्रारंभी धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले

ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता वृत्तपत्र विक्रेता आपली सेवा चोख बजावत असून त्यांनी कोरोना काळात ही फार मोठी योगदान दिले त्यांची दखल घेऊन वेदांत मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल तर्फे पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश भाऊ सावंत यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित केले होते.

वृत्तपत्र विक्रेत्यांकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे तरी त्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ शासनाने स्थापन करावे अशी मागणी यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष रविराज शेटे यांनी केली तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांचे योगदान मोठे असून संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांनी शिबिर आयोजित करून आरोग्याची सर्वांची काळजी घेतली असल्याचे दत्तात्रय पवार यांनी सांगितले.

यावेळी आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा सत्कार अध्यक्ष रविराज शेटे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांचा सत्कार खजिनदार उत्तम काका चौगुले यांच्या हस्ते तर सतीश भाऊ सावंत यांचा सत्कार संघटनेचे उपाध्यक्ष अमोल बोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला

सदर प्रसंगी माजी नगरसेवक आनंद घोंगडे, अंबादास कदम, माणगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासो वाघमोडे , डॉ परेश खंडागळे , डॉ संतोष पाटील , डॉ बिपिन जगताप, डॉ महावीर आलदर , डॉ विनायक डमकले,  पत्रकार विठ्ठल देशपांडे , महेश जम्मा , सचिन धांडोरे , चांगदेव कुंभार,  वृत्तपत्र एजंट सौ संगीता चौगुले , सौ सिंधू जानकर, सौ लतिका मेटकरी, सौ बनुताई जाधव ,अशोक जानकर , संजय पवार, बाबुराव पवार, भानुदास जाधव , बाळू निमकर, जावेद सय्यद ,बाबू चांदणे , गोरख भंडगे, विकास बोत्रे , संतोष गाडेकर , पांडू खटकाळे , राम निमकर, सानिका सावंत, सतीश जाधव, हरिदास मेटकरी ,समाधान धानोरे , सुदर्शन वाघमारे , अक्षय क्षीरसागर, संजय येलपले , सौ स्वप्नाली पवार,  सुनील पवार , अविनाश जानकर उपस्थित होते. संघटनेचे खजिनदार उत्तम काका चौगुले यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!