सांगोला तालुका

शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त युवासेना सांगोलाच्यावतीने महुद जिल्हा परिषद गटात विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

सांगोला(प्रतिनिधी):- शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महुद जिल्हा परिषद गटात युवासेना सांगोला व युवासेना समन्वयक शंकर मेटकरी, युवासेना तालुकाप्रमुख सुभाष भोसले व नवलकुमार गाडे यांच्यावतीने सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले
त्यामध्ये ढाळेवाडी, वाघमोडेवस्ती, खिलारवाडी, चिकमहुद , मुळेवस्ती, बंडगरवाडी, कटफळ, खरातवाडी अशा एकून 8 जिल्हा परिषद प्रथमिक शाळेत व ऊसतोड कामगार व त्यांच्या मुलांना युवासेना विस्तारक उत्तम आयवळे यांच्या हस्ते खाऊ वाटप करुन शिवसेनाप्रमुखांच्या 80 टक्के समाजकाण व 20 टक्के राजकारण ही शिकवणूक जपण्याचा छोटासा प्रयत्न युवासेना सांगोला व पदाधिकारी यांनी केला आहे.
यावेळी नवलकुमार गाडे, सचिन सुरवसे ,आप्पा मेटकरी, अथर्व केंगार, भूषण बागल, साईराज अवघडे,शुभम आनुसे, माऊली गाडवे, शंकर बेरगळ, आशिष भोसले ,अण्णा गाढवे, सागर कोळी आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!