sangolacrimemaharashtra
अज्ञात चोरट्याने पर्समधून पळविला २ लाख ५८ हजार रुपये किमतीचा ऐवज
सांगोला -जत येथील यल्लमा देवीच्या यात्रेसाठी मायलेकी एसटीतून जात असताना सांगोला ते जत प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने आईच्या पर्समधून ६ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ८ भार चांदीचे दागिने असा सुमारे २ लाख ५८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून लंपास केला. ही घटना गुरुवार ११ जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास दुधाळवस्ती, घाडगेवाडी रोड जत जि. सांगली येथे प्रवासादरम्यान घडली. याबाबत, चैताली अशोक सोनार रा. कांदिवली पश्चिम चारकोप , मुंबई यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली असून , सांगोला पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास शून्य क्रमांकाने जत पोलीस स्टेशनला वर्ग केला आहे.
फिर्यादी ,चैताली सोनार ही विवाहिता ११ जानेवारी रोजी जत जि सांगली येथील श्री यल्लमा देवीची यात्रा असल्याने १० जानेवारी रोजी मुंबई येथून सायंकाळी ६ च्या सुमारास निघून दुसऱ्या दिवशी ११ जानेवारी रोजी पहाटे ५ च्या सुमारास सांगोला येथे पोहोचल्या प्रवासादरम्यान त्यांनी त्यांच्याकडील सोन्याचे दागिने बॅगेत ठेवले होते. त्या सांगोला येथून मेथवडे येथील आई-वडिलाकडे गेल्या तेथून परत फिर्यादी चैताली,त्याचे वडील अशोक ,आई जानकी असे तिघेजण मिळून सकाळी ९ वाजता जत येथे जाण्याकरता सांगोल्यात आल्या त्यावेळी फिर्यादीने तिचे व आई जानकी हिचे सोन्याचे दागिने एकत्र करून आईच्या पर्समध्ये ठेवले होते दरम्यान सांगोला येथून एसटी बसने निघून दुपारी दीडच्या सुमारास जतमध्ये पोहोचल्या. त्या ठिकाणी पोचल्यानंतर आत्या सीताबाई सोनार यांच्या घरी गेल्यावर जेवण केल्यानंतर पुन्हा यात्रेत जाण्याकरता निघाल्या त्यावेळी आईने तिची पर्स पाहिली असता पर्स मधील सव्वा तोळे सोन्याचे नेकलेस, ११ ग्रॅम सोन्याचे चैन, ३ ग्रॅम सोन्याचे कानातील रिंगा, १ तोळा सोन्याचे मंगळसूत्र, ३ ग्रॅम सोन्याची अंगठी व आई जानकी हिचे १ तोळा सोन्याचे मंगळसूत्र, ४ ग्रॅम सोन्याची ठुशी ५ ग्रॅम सोन्याची बोरमाळ व चांदीचे पैंजण, जोडवी, कडा असे ८ भार चांदीचे व सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत म्हणून सदरचा प्रकार आईने पती अशोक यांना सांगितला. सर्वांनी मिळून पर्समध्ये तसेच मेथवडे येथील घरी शोधाशोध केली असता वरील किमतीचे दागिने मिळून आले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.