आयुष व्यसनमुक्ती केंद्रात कुटुंब मेळावा संपन्न!

व्यसनातून बाहेर येण्यासाठी उपचार पद्धती मधील एक भाग म्हणजे कुटुंब समुपदेशन. ज्याला शास्त्रीय भाषेत सायको एज्युकेशन असे म्हटले जाते वेगवेगळ्या पातळ्यावर समाजाचे, व्यसनी व्यक्तीच्या अवतीभवती असणाऱ्या व्यक्तींचे, कुटुंबीयांचे ही प्रबोधन केले जाते.या कुटुंब मेळाव्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. आजच्या कुटुंब मेळाव्यामध्ये तीस दिवसाचा उपचार पूर्ण करून घरी जाणाऱ्या परिवर्तनवादी मित्रांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. व्यसनरुपी अंधकार आपल्या आयुष्यातून हद्दपार होऊ दे आणि प्रकाश रुपी जीवनाची वाट दिसू दे ….
रुग्ण मित्रांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .जे उपचार पूर्ण करून आज घरी जाणार आहेत त्यांचा सत्कार झेप पुस्तिका व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. तसेच व्यसनामुक्तीच्या या प्रवासात पेशंट सहा महिने उपचारामध्ये असतो. दर महिन्याला फॉलोअप ला येणाऱ्या पेशंटचाही सत्कार आयुष व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉक्टर संदीप तांबारे यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर आई-वडिलांचे पूजन करून घरी जाणाऱ्या परिवर्तनवादी मित्रांनी त्यांचे ऋण व्यक्त केले व इथून पुढे निर्व्यसनीआयुष्य जगण्याचे आश्वासन दिले .फोलोअपला आलेला पेशंट खऱ्या अर्थाने व्यसनावरील उपचार घेऊन बाहेर पडल्यावर निर्व्यसनी आयुष्य जगण्याचे आव्हान कसे पेलतो?याविषयी आपले अनुभव शेअर केले
यावेळी बीडहून आलेले संतोष मोराळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या मनोगतामध्ये त्यांनी मृत्यूच्या दाढेतून परत आल्यानंतर आयुष व्यसनमुक्ती केंद्राने आपल्याला जीवनदान दिल्याचे व्यक्त केले. उपचारासाठी इथे असतानाच आपल्याला कविता लेखनाचा छंद जडला आज 70 हून अधिक कविता त्यांनी केल्या असून लवकरच त्या कवितांचे पुस्तक प्रकाशन डॉक्टर संदीप तांबारे यांच्या हस्ते करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
यावेळी श्री.चक्रवर्ती वाघमारे, श्री देवळे, श्री प्रदीप शेळवणे, श्री चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. संदीप तांबारे यांनी उपस्थित कुटुंबीयांना मार्गदर्शन केले व व्यसनमुक्तीच्या या लढ्यात आपण सगळे सामील झालात याबद्दल धन्यवाद दिले.
व्यसनाने त्रस्त कुटुंबियातील स्त्री सदस्यांचे समुपदेशन करण्यात आले.मनोबल वाढवण्यासाठी तसेच त्यांना काही वैवाहिक टिप्स देत सहचरणी गट आयुष व्यसनमुक्ती केंद्राच्या कुटुंब समुपदेशक सोलापूरहून आलेल्या मृणालिनी मोरे मॅडम यांनी हा गट घेतला. तर कुटुंबातील लहान मुलांना मनोरंजन पर खेळ घेत, अंकुर गट घेण्यात आला. यासाठी व्यसनमुक्ती केंद्राच्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधू शिनगारे व अश्विनी कुंभार तसेच शरद तुपेरे सर , स्वप्निल जाधव सर,सागर शिंदे सर , आयुष व्यसनमुक्ती केंद्र चे मॅनेजर गणेश तांबारे सर यांनी सहकार्य केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोहित गोरे ,सुजित ढेकळे, राहुल काटे यांनी परिश्रम घेतले.राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.