नंदेश्वर येथे देवसागर साधक ट्रस्टच्या वतीने योग शिबिर संपन्न

मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे देवसागर साधक ट्रस्ट व संजीवनी वेलनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने माऊली मंदिरासमोरील पटांगणात योग विज्ञान व निसर्गोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीराचे उद्घाटन समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष (शिंदे गट) पै.अशोक चौंडे,चेतना पतसंस्थेचे चेअरमन बापू गरंडे,माजी प्राचार्य भारत बंडगर, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मेटकरी,सुधीर गरंडे,अण्णा बंडगर,नवनाथ मेटकरी,महादेव क्षीरसागर,भारत गरंडे,बाळू मोटे, माणिक पाटील,भागवत कांबळे भगवान भोसले,चंदू लाड शामराव बंडगर,पोपट बंडगर, मारुती गरंडे,दिनेश मेटकरी, तानाजी गरंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
या शिबिरामध्ये संतोष दुधाळ व नितीन मोरे यांनी मार्गदर्शन केले तसेच सत्येंद्रसिंग धीरज व पवार मॅडम यांनी तपासणी व उपचार केले.या शिबिरामध्ये लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग नोंदवला.



