आमदार शहाजीबापू पाटील यांची जगभरात ख्याती;
हॉर्बीगर लिमिटेड प्रा इंडिया ही कंपनी जगभरातील१२८ देशांमध्ये कार्य करते या कंपनीचे मुख्य कार्यालय ऑस्ट्रिया देशातील वियन्ना येथे आहे ही कंपनी कंपनीतील कर्मचारी यांच्या सामान्य ज्ञानासाठी व मनोरंजनासाठी महिन्यातून काही कार्यक्रम राबवत असते याचाच एक भाग म्हणून ऑस्ट्रिया या देशांमधून कर्मचारी यांच्यासाठी सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित केली जाते या स्पर्धेमध्ये जगभरातील अग्रण्य प्रसिद्ध कर्तबगार व्यक्तिमत्त्वाचे फोटो प्रसारित करण्यात येतात व ६ सेकंदामध्ये या व्यक्तींना ओळखून त्यांचे नाव सांगायचे असते या स्पर्धेमध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रतिमेचा समावेश होता प्रतिमा पाहून महाराष्ट्रातील सॉफ्टवेअर इंजिनिअर यांचा आनंदाने उर भरून आला परदेशातून परत आल्यानंतर इंजिनीयर मंडळींनी आमदार शहाजीबापू पाटील यांची सांगोला येथे भेट घेत तुम्ही पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाला असल्याची आनंद भावना व्यक्त केली यावरून आमदार शहाजी बापू पाटील यांची लोकप्रियता जगामध्ये झाली असल्याचे दिसून येते यामुळे निश्चितच सांगोला विधानसभा मतदारसंघातील आमदार यांचा नावलौकिक जगभर झाला आहे याची पुन्हा एकदा प्रचिती आली
चौकट: मी मेडशिंगी तालूका सांगोला येथील रहिवाशी असून हॉर्बीगर प्रा लिमिटेड इंडिया या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर पदावर काम करतो या कंपनीच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी ऑस्ट्रिया या देशामध्ये सामान्य ज्ञान व मनोरंजनासाठी आयोजित केलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रतिमेचा समावेश पाहून आम्ही महाराष्ट्रातील इंजिनियर मंडळी भारावून गेलो मी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघातील असल्याने माझ्याबरोबरील १७८सहकारी मित्रांना माझ्याबद्दल वेगळा आदर निर्माण झाला मी सांगोला विधानसभा मतदारसंघातील असल्याचा मला पहिल्यांदा सार्थ अभिमान वाटला
विकास किसन राऊत- मेडशिंगी ,
सॉफ्टवेअर इंजिनियर
हॉर्बिगर इंडिया प्रा लि..