शिवतेज अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीची चौथी सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.

सांगोले शहरातील शिवतेज अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन शिवाजी नाना बनकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी श्री संत सेना मंदिर मिरज रोड सांगोला येथे खेळीमेळ्याच्या वातावरणात पार पडली.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीची पूजन व दीप प्रज्वलन संस्थेचे सर्व संचालक यांच्या वतीने करण्यात आले संस्थेचे चेअरमन यांनी प्रारंभी सर्वांची स्वागत करून संस्थेस अहवाल वर्षात 663522 एवढा नफा झाल्याचे सांगितले त्यांनी सर्व कर्जदार ठेवीदार सभासद यांच्यामुळे ही संस्था अधिकृत करत असून पुढील वर्षात सभासदांनी विश्वास ठेवून सहकार्य करावे असे सांगितले. प्रारंभी प्रास्ताविक संस्थेचे संचालक अरविंद केदार यांनी केले. सूत्रसंचालन संस्थेचे व्हा. चेअरमन अच्युतराव फुले यांनी केले विषय पत्रिकेवरील सर्व विषयाचे वाचन व्यवस्थापक अनिल कुमार लोटके यांनी केले
या कार्यक्रमांमध्ये वैधानिक लेखापरीक्षक मणेरी यांनी संस्थेच्या कारभाराविषयी समाधान व्यक्त केले व संस्थेस “अ” वर्ग प्राप्त झाल्याचे सांगितले. या कार्यक्रमास संस्थेचे मयत झालेले सभासद , सोनंद येथील शहीद जवान तेजसिंग सांळुखे यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमास उद्योगपती रमेश फुले( सर ,) मधुकर बनसोडे, बाळासाहेब माळी भारत राऊत चंद्रकांत आदलिंगे उत्तम किसन बनकर, सचिन भंडारे ,अमोल भंडारे शुभम बनकर, रमेश साळुंखे संतोष गायकवाड ,सोमनाथ लिंगे, सुनील जाधव, देवा मासाळ यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद संचालक मंडळ कर्मचारी पिग्मी एजंट उपस्थित होते. आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक विजय म्हेञे यांनी केले.



