महाराष्ट्र

कोळा विद्यामंदिर हायस्कूलचे मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश

कोळा (वार्ताहर ) :- कोळा विद्यामंदिर हायस्कूलने मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा -2025 मध्ये घवघवीत यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कुमारी समृद्धी इराप्पा कोळेकर( इ.5 वी ) (गुण-188 /300) केंद्रस्तरीय प्रथम क्रमांक, कुमारी श्रेया गोरख आलदर (इ. 6 वी ) (गुण-212/300) केंद्रस्तरीय द्वितीय क्रमांक, कुमार प्रज्वल बिरुदेव जावीर (इ. 8 वी ) ( गुण -256/300) केंद्रस्तरीय प्रथम क्रमांक, कुमारी ज्ञानेश्वरी समाधान आलदर( इ. 8 वी ) -( गुण-250/300) केंद्रस्तरीय द्वितीय क्रमांक मिळवला.

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा व विभाग प्रमुखांचा सत्कार प्रशालेतर्फे घेण्यात आला, त्याचबरोबर मंथन वेल्फेअर फाउंडेशन तर्फे यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी देण्यात आलेली होती ती ट्रॉफी ही विद्यार्थ्यांना या सत्कार प्रसंगी दिली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धा परीक्षांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

सदर कार्यक्रमप्रसंगी मुख्याध्यापक /प्राचार्य श्रीकांत लांडगे सर, पर्यवेक्षक चारुदत्त जगताप सर, बाह्यपरीक्षा विभाग प्रमुख प्रसादसिंह आदाटे सर, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर सांगोलकर सर, सर्व शिक्षक-शिक्षिका- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके सर, संस्था सचिव म. शं.घोंगडे सर, खजिनदार शं.बा. सावंत सर, संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब, संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेशजी झपके साहेब तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती सरगर सर यांनी केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button