महाराष्ट्र

यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी व परिश्रमाची गरज:-सौ.शीलाकाकी झपके.*

यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे जिद्द,चिकाटी असली पाहिजे तसेच आपली परिश्रम घेण्याची तयारी असली पाहिजे असे प्रतिपादन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदस्या सौ. शीलाकाकी झपके यांनी केले. सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये दि. 22 जुलै रोजी इयत्ता दहावी व सायन्स ऑलंपियाड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कु.रोहिणी महारनवर, पर्यवेक्षिका कु. सुकेशनी नागटिळक  उपस्थित होत्या.

 

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळात यापेक्षाही उज्वल यश संपादन करावे व त्यासाठी अथक परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी असे सांगितले तसेच या यशाबद्दल मुख्याध्यापिका,सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे कौतुक केले.तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती व कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित करण्यात आला. यानंतर हाऊस परेड आणि स्टुडंट कौन्सिलमधील निवडलेले विद्यार्थी व विद्यार्थीनी आरोही सावंत ,शिवराज कळसुले ,सोनल जगधने ,सोहम जाधव ,हर्ष तांबोळी ,युगंधरा देशमुख,समर्थ पाटणे,साक्षी सिंग,ओंकार सोंडकर तसेच विद्यार्थी प्रतिनिधी कु.ओंकार सलगर व विद्यार्थीनी प्रतिनिधी कु. ईश्वरी बुरांडे यांना सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली.मतदानप्रक्रीयेद्वारे विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थीनी प्रतिनिधी यांची निवड करण्यात आली.मतदान प्रक्रियेद्वारे विद्यार्थी व विद्यार्थीनी प्रतिनिधी यांच्या निवडप्रक्रियेसाठी विभागप्रमुख म्हणून कु. दिपाली बसवदे यांनी काम पाहिले.यावेळी विद्यार्थ्यांचा अलंकरण समारोह पार पडला हा समारोह पार पाडण्यासाठी कु. पल्लवी थोरात,तसमीन मणेर, क्रीडाशिक्षक श्री.सासणे सर यांनी काम पाहिले.

 

तत्पूर्वी कु. शुभांगी घार्गे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना भविष्यात विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती दिली. त्याचबरोबर कु. आरती फुले यांनी SOF परीक्षेसंबंधी माहिती दिली तद्नंतर इयत्ता दहावीत ९०टक्के पेक्षा जास्त गुण संपादन करणारया विद्यार्थ्यांचा व सायन्स ऑलिंपियाड(SOF)परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच इयत्ता दहावीसाठी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारया मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे, सुकेशनी नागटिळक,लता देवळे, शुभांगी घार्गे,आरती फुले, पल्लवी थोरात, तसमीन मणेर,श्री. संगमेश्वर घोंगडे, सुभाष निंबाळकर तसेच सायन्स ऑलंपियाड परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारया विभाग प्रमुख कु. आरती फुले, सविता गोडसे, वर्षा मुडवे,सविता फडतरे, चेतना लोखंडे, संगिता खांडेकर, पल्लवी थोरात, सुप्रिया देवकते, कोमल भाटेकर,सुरेखा माने, रेणुका सुरवसे, तसमीन मणेर,दिपाली बसवदे,सफुरा सय्यद,मिनाक्षी बिराजदार,अनुपमा पाटणे,स्वप्नाली एखतपुरे, प्रियांका नामदे, श्री.संतोष बेहेरे,युवराज केंगार,तुकाराम गेजगे सेविका किर्ती साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने पालक सौ व श्री. वसंत दिघे यांचेवतीनेही इ. दहावीच्या मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार संपन्न झाला.

 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मिनाक्षी बिराजदार यांनी केले तर कु. सविता गोडसे यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button