सांगोला महाविद्यालयामध्ये एक दिवसीय नवलेखक लेखन कार्यशाळा संपन्न; लेखकांमुळेच समाजात क्रांती घडते : कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस

सांगोला (प्रतिनिधी):- विद्यार्थ्यांना लेखनाची गोडी लागावी यासाठी विद्यापीठाने नवलेखक लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे स्पष्ट करून, लेखक हा समाजाचा आदर्श असतो. लेखकांचे विचार समजून घेऊनच समाजातील लोक जगत असतात. लेखक समाजाचा कणा असतो. लेखकामुळेच समाजात क्रांती घडते. असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे वतीने येथील सांगोला महाविदयालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय नवलेखक लेखन कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस बोलत होत्या. यावेळी त्या ऑनलाईन उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले होते. यावेळी संस्था सदस्य मा. सुरेश फुले, विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.केदारनाथ काळवणे यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
या एक दिवसीय नवलेखक लेखन कार्यशाळेचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र.कुलगुरु डॉ.राजेश गादेवार, संस्था सचिव म. सि. झिरपे, संस्था सदस्य मा. सुरेश फुले, संचालक केदारनाथ काळवणे, प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले,
समन्वय डॉ.राम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रामध्ये ललित साहित्याची निर्मिती प्रक्रिया या विषयी प्रा.डॉ.एकनाथ पाटील (इस्लामपूर) यांनी मार्गदर्शन केले. वैचारिक आणि समीक्षात्मक लेखनाचे स्वरूप याविषयी प्रा.डॉ. नंदकुमार मोरे (कोल्हापूर) यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्रा डॉ. बबन गायकवाड हे होते. लेखन प्रकार : स्वरुप आणि विशेष याविषयी डॉ. दत्तात्रय घोलप यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयीन नियतकालिकाचे संपादन जबाबदारी आणि भूमिका या विषयी प्रा. डॉ. राजाराम झोडगे (परभणी) यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी डॉ. नवनाथ शिंदे हे होते
या कार्यशाळेमध्ये विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयातील सुमारे दीडशे प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.बाबुराव गायकवाड, प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांचे मार्गदर्शनाखाली समन्वय
डॉ.राम पवार, विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, डॉ. यशपाल खेडकर, डॉ.तानाजी माने, डॉ. विधिन कांबळे, प्रा. संतोष लोंढे, डॉ. नवनाथ शिंदे, प्रा. शामराव नवले, डॉ. रेणुकाचार्य खानापुरे, डॉ. राजकुमार महिमकर, डॉ.मालोजी जगताप, डॉ.विद्या जाधव, प्रा सोनल भुंजे, डॉ. अमोल पवार, अधिक्षक श्री. प्रकाश शिंदे, विद्यापीठ लिपिक नानक लटके यांचेसह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
लेखनासाठी पुस्तक आणि माणसं वाचणं महत्त्वाचं : डॉ. केदारनाथ काळवणे
व्यक्त होण्यातून लेखक पुढे जात असतो. आजच्या विद्यार्थ्या पुढे व्यक्त होण्यासाठी समाज माध्यमे आहेत. या माध्यमांचा विद्यार्थ्यांनी योग्य वापर करावा. लिखानासाठी लेखकाचा अनुभव हे देखील महत्वाचे साधन आहे. लेखकाला स्वतःच रक्त आठवावे लागते. तेव्हाच शब्दाची सृष्टी निर्माण होत असते. असे मत यावेळी विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.केदारनाथ काळवणे यांनी व्यक्त केले.