सांगोला तालुका

सांगोला नगरपरिषदेची मालमत्ता कर, पाणीपट्टी,इमारत व जागा भाडे यांची विक्रमी वसुली

सांगोला नगरपरिषदेमार्फत आर्थिक वर्ष 2022-2023 च्या मालमत्ता कर, पाणीपट्टी,इमारत व जागा भाडे यांच्या एकूण 10 कोटी 58 लाख मागणीपैकी तब्बल 7 कोटी रुपये एवढी करांची विक्रमी वसुली करण्यात आली, अशी माहिती सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी दिली.

*मालमत्ता कर (2022-2023)*

एकूण मागणी- 4 कोटी 90 लाख
एकूण वसुली – 3 कोटी 10 लाख

*पाणीपट्टी (2022-2023)*

एकूण मागणी- 3 कोटी 82 लाख
एकूण वसुली – 2 कोटी 90 लाख

*इमारत व गाळा भाडे (2022-2023)*

एकूण मागणी – 1 कोटी 86 लाख
एकूण वसुली – 1 कोटी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 2 वर्षे नागरिक, व्यापारी हे नाजूक अशा आर्थिक परिस्थितीतून जात होते.त्यामुळे नगरपरिषदेमार्फत कर वसुलीसाठी विशेष अशी वसुली मोहीम घेण्यात आली नव्हती.स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने विशेष वसुली मोहीम राबवून जास्तीत कर वसुली होणे आवश्यक असते.त्यामुळे कोरोना महामारीला तोंड देऊन सर्व नागरिक,व्यापारीवर्ग स्थिरस्थावर झाल्यानन्तर या वर्षी नगरपरिषदेमार्फत वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम हाती घेण्यात आली होती. या वसुली मोहिमेअंतर्गत कर विभागाकडील 16 कर्मचारी तसेच पाणीपुरवठा विभागाकडील कर्मचारी यांचेमार्फत थकबाकीदार यांना लक्ष करून कर भरणा करण्याबाबत नोटिसा देणे, वारंवार पाठपुरावा करणे ,वेळप्रसंगी पाणीपुरवठा खंडित करणे, गाळे सिल करणे, मालमत्तांना जप्तीपूर्व नोटिसा देणे यासारखी कारवाई करण्यात आली .
नगरपरिषदेकडून सुरू असलेल्या या विशेष वसुली मोहिमेला सांगोला नगरपरिषद हद्दीतील नागरिक व व्यापारी वर्ग यांनी देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला.एक सुजाण नागरिक म्हणून सर्वांनी कर भरणा करून नगरपरिषदेस सहकार्य केले असून अद्यापही बरेचशे थकबाकीदार असून त्यांचेमार्फत कर भरणा करणेसाठी नगरपरिषद प्रयत्नशील आहे. थकबाकी रकमेवर महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील तरतुदीनुसार मासिक 2% दंडाची आकारणी केली जात असल्याने थकबाकीदारांनी लवकरात लवकर आपला थकीत कर भरणा करावा, असे आवाहन ही याद्वारे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी नागरिकांना केले.
सदर वसुली मोहीम यशस्वी राबवून विक्रमी वसुली करण्यासाठी मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक व लेखापाल श्री. विजयकुमार कन्हेरे,कर निरीक्षक तृप्ती रसाळ,सहा.मालमत्ता पर्यवेक्षक स्वप्निल हाके,पाणीपुरवठा अभियंता श्री. तुकाराम माने, लेखापरीक्षक श्री. जितेंद्र गायकवाड,सेवानिवृत्त श्री.सूर्यकांत रणदिवे,
पाणीपुरवठा व कर विभागाकडील सर्व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.

*सांगोला शहरातील सर्व कर भरणा करणाऱ्या सुजाण नागरिक व व्यापारी यांनी कर भरणा करून नगरपरिषदेस सहकार्य केले आहे. अजूनही कर थकीत असणाऱ्या मालमत्ता धारकांकडून कर वसुलीसाठीची मोहीम सुरूच राहणार आहे. थकबाकीच्या रकमा न भरणाऱ्यांसाठी मासिक 2% दंडाची कारवाई टाळण्याची ही शेवटची संधी असून सर्व थकीत मालमत्ताधारकानी लवकरात लवकर कर भरणा करावा व दंडात्मक कारवाई टाळावी*

*डॉ.सुधीर गवळी*
*मुख्याधिकारी*
*नगरपरिषद सांगोला*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!