सांगोला तालुका

कविता सादर करताना जिगर असावी लागते:: डॉ आरुण म्हात्रे

सायंकाळी “भेदिक शाहिरी” आणि उदय साटम यांच्या “माय मराठी” कार्यक्रमाने साहित्य सममेलनाची रंगत वाढली

सांगोला:: मराठी साहित्य संमेलन कोणतेही असो कविता सादर करताना जी जिगर असावी लागते. ती जिगर आज सांगोला येथे संपन्न झालेल्या काव्य संमेलनात सहभागी झालेल्या कवी कवियात्रिनी दाखवून दिले.ग्रामीण साहित्य संमेलनाचा आजचा दुसरा दिवस संत साहित्य व समाज परिवर्तन, माणदेश स्वरूप आणि साहित्य या सह परिसंवादासह, कथाकथन, मुलखत यांनी चांगलाच रंगला असे उदगार कवी समलनाचे अध्यक्ष अरुण म्हात्रे यांनी काढले. ग्रामीण साहित्य संमेलनाच्या दी ९ रोजी सादर झालेल्या समलेंनचा दुसरा भाग सदर करताना हे बोलत होते.संमेलनाचे सूत्र संचालन कवी सुरेश शिंदे यांनी केले.सायंकाळच्या वेळी जयवंत रणदिवे, युवा शाहीर अमोल रणदिवे व उदय सामंत (मुंबई) यांचा “माय मराठी” महाराष्ट्राची लोकधारा हा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या सत्रात संत साहित्य व समाज परिवर्तन या परिसंवादाने सुरवात झाली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ. प.जयवंत बोधले महाराज यांनी संताचे कार्य,मराठी साहित्य संस्कृती आणि उपदेश या विषयावर परिसंवाद साधून प्रेक्षकांची मने जिंकली,त्यानंतर झालेल्या
“कथाकथन” कार्यक्रमात अप्पासाहेब थोरात यांनी “मरणादरीत” ही गवगाड्याच्या संस्कृतीचे दर्शन घडविनारी अस्सल कथा विनोदी शिलित सादर केली. तर स्थानिक कथाकार ज्योतिराम फडतरे यांनी “शाळा तपासणी”ही कथा सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.त्यानंतर माझी प्राचार्य डॉ कृष्णा इंगोले यांची प्रकट मुलाखत सुभाष कवडे, अँड गजानन भाकरे यांनी घेतली.दुपारच्या सत्रा मध्ये समेलन संयोजन समिती अध्यक्ष बाबुरावभाऊ गायकवाड,डॉ सयाजीराव मोकाशी,डॉ अरुण शिंदे यांनी सहभाग नोंदवून माणदेशी मातीतील शिक्षण, शेती,संस्कृती,परंपरा या विषयावर प्रकाश टाकून माणदेशी प्रेक्षकांची मने जिंकली.

दुपारच्या सत्रात झालेल्या “कविसंमेलनास” महाराष्ट्रातील नामवंत कवींनी सहभाग नोंदवत विविध कविता सदर केल्या.कवी संमेलनाचे अध्यक्ष अरुण म्हात्रे यांनी “ते दिवस आता कुठे” ही अप्रतिम कविता सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.यावेळी त्यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणात मराठी साहित्य संमेलन कोणतेही असो कविता सादर करताना जी जिगर असावी लागते. ती जिगर आज सांगोला येथे संपन्न झालेल्या काव्य संमेलनात सहभागी झालेल्या कवी कवियात्रिनी दाखवून दिले आहे.आज ग्रामीण भागामध्ये नवनवीन कवी निर्माण होत असून त्यामध्ये विविध विषयावर प्रकाश टाकणाऱ्या कविता सादर करीत असल्याने समाधान वाटत असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.आहे.कवी संमेलनाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी सुरेश शिंदे यांनी करीत असताना सुंदर कविता सादर केली.दरम्यान नारायण पुरी यांनी “काटा” कवितेसह नवजलेली “जांगडगुत्ता”कविता सादर करून रसिकांची मने जिंकली.तर रमजान मुल्ला यांनी आपल्या पहाडी आवाजात देहाला फुटती पाने,पाण्यातून येते गाणे” ६ कविता संग्रह लिहलेले कवियात्री स्वाती शिंदे (पवार)यांनी सुरेख आवजात “बयो”कविता सादर करून उपस्थित महीलांसह सर्वांचिच मने जिंकली.यावेळी हनुमंत चांदगुडे बारामती यांनी “चोरी” विजय जाधव मुंबई “अचानक येणाऱ्या, पावसा प्रमाणे तुझं येणं ही (पत्नी जीवन )आधारित तर राजेंद्र वाघ यांनी “उजेड धरू” ही कविता सादर केली. याशिवाय प्रकाश होळकर, संदीप जगताप, विष्णू थोरे, अनिल दीक्षित,जितेंद्र लाड, राधिका फराटे,विजय जाधव महेश मोरे नितीन वरणकर, राजेंद्र वाघ यांच्यासह स्थानिक कवींनी सहभाग घेतला होता.उपस्थित कवींचे यावेळी नियोजन समितीचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड कार्याध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके व सहसचिव अँड उदय बापू घोंगडे यांनी सत्कार केला.

रविवारी झालेल्या कवी संमेलनामध्ये मुबई अग्निशामक दलाचे अधिकारी विजय जाधव,उपशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे,सांगोला पंचायत समिती बी. डी. ओ.आनंद लोकरे यांचेसह सांगोल्याच्या नवोदित कवियत्री हर्षदा गुळमिरे यांनी कविता सादर केल्या.

माणदेशी स्वरूप आणि साहित्य या विषयावर परिसंवाद साधत असताना कविसंमेलनाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांनी माणदेशी माती,पाणी आणि शेती या विषयावर विस्तृत संवाद साधला.यावेळी सयाजीराव मोकाशी अरुण शिंदे परिसंवादाचे अध्यक्ष सांगोल्याचे रहिवासी असलेले अविनाश सांगोलकर सध्या पुणे यांनी माणदेश, माण नदी आणि माणदेशी ग्रामीण साहित्य यावर प्रकाश टाकत माणदेशातील ५० साहित्यिक आणि त्यांच्या साहित्याची ओळख करून दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!