सांगोला तालुका

नागराजाने उडवली ठोंबरे – केदार परिवाराची भंबेरी; सर्पमित्र संदेश पलसे यांनी नागराजाला केले जेलबंद

सांगोला(प्रतिनिधी):- वेळ सायंकाळी सातची, नुकताच अंधार पडून दिवे लागण झालेली, लहान मुले इकडे तिकडे खेळत होती, त्यातच फॅबटेक कॉलेज मधील प्राध्यापक तन्मय ठोंबरे घराकडे निघाले होते, त्यावेळी या परिसरात राहणारे अक्षय कुलकर्णी गाडी वरून त्यांच्या घराकडे निघाले होते, त्या वेळी त्यांना वासूद हायस्कूल मधील शिक्षक केदार सर यांच्या बंगल्यात गेट मधून भला मोठा जाडजूड साप जाताना दिसला. त्यामुळे कुलकर्णी यांनी प्रा.तन्मय याना ही कल्पना दिली व घरी जाताना पश्चिम दिशेकडील गेट ने घरी जाण्याचा सल्ला दिला.
प्रा.तन्मय यांचा राहत्या घरा मागील मोकळा प्लॉट केदार सर यांचा बंगला जवळ जवळ आहे. केदार यांच्या बंगल्यात साप शिरल्याचे समजल्यावर ठोंबरे व केदार यांच्या परिवारात भीतीचे वातावरण पसरले. सापाला पाहून घरातील मांजर कंपाऊंडचे भिंतीवर दबा धरून सापावर लक्ष ठेवून होते. प्रा.तन्मय यांनी तात्काळ सर्पमित्र संदेश पलसे यांना कल्पना दिली. दहाच मिनिटात संदेश पलसे व शंभू झपके घटना स्थळी दाखल झाले.
बरीच शोधाशोध झाल्या नंतर सदर साप संदेश पलसे यांच्या दृष्टीस पडला. साधारणपणे हातभार लांबी व जाडजूड असणारा या सापाने फणा काढताच तो नागराज असल्याची जाणीव उपस्थितांना झाली. पलसे यांनी सदर साप हा नाग असून विषारी असल्याचे सांगितले. शंभुराजे झपके सर यांच्या मदतीने पालसे यांनी सदर नागराजला बाटली बंद केले. त्यास नैसर्गिक अधिवासात सोडून देणार असल्याचे पलसे यांनी सांगितले.ठोंबरे परिवाराने पलसे व झपके यांचे आभार मानले.

उन्हाळा असल्यामुळे असे प्राणी रात्री अपरात्री बाहेर पडतात, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी व सर्प दर्शन झाल्यास घाबरून न जाता सर्प मित्रास बोलावून घ्यावे.
संदेश पलसे, सर्पमित्र, सांगोला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!