सांगोला महाविद्यालयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

सांगोला:- सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ संचलित, सांगोला महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविदयालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी डॉ. सुरेश भोसले म्हणाले की, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड मेहनत घेऊन भारतीय राज्यघटना निर्माण केली असून भारतातील लोकशाही त्यामुळे अबाधित राहिली आहे. त्यांची ज्ञानसाधना अलौकिक स्वरूपाची होती. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे अधिक्षक श्री. प्रकाश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा.पी.एस.पाटील, प्रा.एस.जी. पाटील व श्री. सत्यवान भोसले यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विदयार्थी उपस्थित होते.