सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

शेतकरी कामगार पक्षाच्या सांगोला येथील  शेतकरी मेळाव्यास महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित राहणार–डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख‌*

आज सांगोला मार्केट यार्डामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या व पुरोगामी युवक संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या , कष्टकरी जनतेच्या, कामगारांच्या व लहान मोठे व्यावसायिक व विद्यार्थी व दलीत यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भव्य शेतकरी मेळावा सकाळी ११-०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सदर मेळाव्यास महाविकास आघाडीचे राज्यातील नेते उपस्थित राहणार आहेत त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद‌ पवार पक्षाचे आमदार रोहीत दादा पवारसाहेब तसेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माननीय प्रविणजी गायकवाड हे उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत
   या शेतकरी मेळाव्यामध्ये खालील विषयावरची चर्चा करुन ते प्रश्न सरकार दरबारी पोहचवुन ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.त्यामध्ये दुष्काळी परिस्थितीचा विचार करून नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय ताबडतोब करण्यात यावी
तसेच जनावरांच्या चाऱ्याची सोय सरकारने ताबडतोब करावी.. दुष्काळी जनतेचे विजबिल माफ करावे.. विद्यार्थ्यांना शालेय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात व भरमसाठ आकारली जाणारी शालेय फिज कमी करावी..तसेच टेंभू -म्हैसाळ योजनेद्वारे माण नदीत काठचे बंधारे ताबडतोब भरुन घ्यावेत तसेच पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करावेत आशा व इतर काही महत्त्वाचे प्रश्न सरकार पर्यंत पोहचून ते सोडवुन घेण्यासाठी मार्केट कमिटी सांगोला येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे
  या मेळाव्यास गावोगावचे नेते कार्यकर्ते, पदाधिकारी व हितचिंतक तसेच‌ तालुक्यातील महाविकास आघाडीतील  कांग्रेस पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तसेच अनेक समविचारी पक्षाचे‌ अनेक मानन्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी या शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहावे.व गावोगावच्या वाहन धारकांनी आपापली वाहने घेऊन महात्मा फुले चौक सांगोला येथे सकाळी ९-३० वाजता रॅलीसाठीही उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांनी केल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!