*कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी*

कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोळा येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली

 

यावेळी संस्थेचे संस्थाध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य श्रीकांत लांडगे सर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन पर्यवेक्षक चारुदत्त जगताप सर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

विद्यार्थ्यांमधून ऐश्वर्या पांडुरंग कोळेकर, सोनाली अशोक सरगर,शंकर चौधरी या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रशालेतील शिक्षक अशोक सरगर सर यांनी अण्णाभाऊ साठे यांचा जीवन परिचय करून दिला. तसेच लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यासाठी भारतीयांच्या मनामध्ये आपल्या लेखणीतून आवाज उठवला व त्यांचा जीवन परिचय व सामाजिक कार्याची माहिती दिली.

यावेळी प्रभूलिंग तेली सर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा परिचय करून दिला. लोकनाट्यातून लोक जागृती करणारे अण्णाभाऊ साठे प्रतिभावंत होते. तसेच लोकमान्य टिळक यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक चळवळी केल्या. आपल्या वृत्तपत्रातून भारतीय स्वातंत्र्याची जाणीव लोकमानसात पोहोचवण्याचं कार्य लोकमान्य टिळकांनी केलं. काही वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला असे त्यांनी सांगितले.

 

यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मारुती सरगर सर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button