सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

सांगोला (वार्ताहर) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध गटांमध्ये वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. सदर स्पर्धेमध्ये एकूण 150 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
यशस्वी विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे
इयत्ता पाचवी-सहावी गट
प्रथम क्रमांक गौरी नागेश लवटे (6 वी-अ)
द्वितीय क्रमांक वैष्णवी पांडुरंग पाटील (6 वी-ब)
तृतीय क्रमांक श्रावणी दिलीप लवांडे ( 5 वी-अ)
इयत्ता सातवी-आठवी गट
प्रथम क्रमांक समरजीत सुशांत पाटील (7 वी-ड),
द्वितीय क्रमांक आराध्या ऋषिकेश पाटील (7 वी-ड),
तृतीय क्रमांक संस्कृती संतोष लोंढे (7 वी-ड),
इयत्ता नववी-दहावी गट
प्रथम क्रमांक समृद्धी संजय भोसले (10 वी-ब),
द्वितीय क्रमांक मृणाल उमेश महाजन (9 वी-ब),
तृतीय क्रमांक सृष्टी दत्तात्रय वाघमारे (9 वी-ब)
इयत्ता अकरावी-बारावी गट
प्रथम क्रमांक सृष्टी सुनील लिगाडे (12 वी संयुक्त),
द्वितीय क्रमांक साक्षी बिरा बंडगर (11 वी शास्त्र,फ),
तृतीय क्रमांक स्नेहल लिंगराज बोधगिरे (11 वी संयुक्त) व प्रतीक्षा रावसाहेब बंडगर (12 वी शास्त्र-ब) विभागून
स्पर्धेच्या सुरुवातीस लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार समर्पण स्पर्धकांच्या शुभहस्ते व संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, प्राचार्य अमोल गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर उपमुख्याध्यापिका शाहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, प्रदीप धुकटे, मच्छिंद्र इंगोले उपस्थित होते.
सदर स्पर्धेचे अशितोष नष्टे, काकासाहेब नरुटे, स्वाती चांदणे, सिताराम राऊत, दादासाहेब वाघमोडे, शुभांगी पलसे, शैलजा झपके, अनिता घोंगडे, नागेश भोसले, इसाक मुल्ला, माधुरी पैलवान, आश्विनी जालगिरे यांनी परीक्षक म्हणून तर रूपाली सरगर, श्रीकृष्ण वाघमारे, बंडू लेंडवे यांनी टाईमकीपर म्हणून काम पाहिले.
स्पर्धेचे सूत्रसंचालन व आभार वसंत गुळमिरे, दत्तात्रय पाटील, उमेश नष्टे, अर्चना कटरे, राधा रिटे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाङ्मय विभागाचे शिवशंकर तटाळे, उन्मेष आटपाडीकर, उत्सव विभागाचे तानसिंग माळी, बापूसो सावंत, नरेंद्र होनराव यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.



