चिंचोली माध्य. विद्यालय चिंचोली मध्ये अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

चिंचोली माध्यमिक विद्यालय चिंचोली मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाग्यवंत बेहेरे सर व ए.एस. खंडागळे सर यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णदेव बेहेरे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी शिक्षक मनोगत म्हणून शिनगारे मॅडम यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल सखोल माहिती सांगून विद्यार्थ्यांची मने जिंकली विद्यार्थ्यांनी माहिती आत्मसात केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णदेव बेहेरे सर यांनी अण्णाभाऊ साठे यांचे विचार आत्मसात करावे असे त्यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी प्रशालेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक कृष्णदेव बेहेरे सर सर्व शिक्षक शिक्षिका व इतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.



